भाजपच्या माजी नगरसेवक दाम्पत्यावर गुन्हा
By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 31, 2023 15:35 IST2023-03-31T15:33:58+5:302023-03-31T15:35:05+5:30
दोन्ही गटातील वादातून हा प्रकार घडला आहे.

भाजपच्या माजी नगरसेवक दाम्पत्यावर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : भाजपचे माजी नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या तक्रारीवून रबाळे पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. गवते यांच्याकडून त्यांच्याविरोधात देखील तक्रार केली असून दोन्ही गटातील वादातून हा प्रकार घडला आहे.
भाजपचे माजी नगरसेवक नवीन गवते, माजी नगरसेविका अपर्णा गवते, विरेश सिंग, रागिणी झा, रणजित झा व अथर्व गवते यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत व तक्रार मागे घेण्यासाठी पैशाची मागणी केल्याचा आरोप दिघा येथील रहिवाशी ओंकार काळे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली होती. ओंकार यांचे वडील सुभाष काळे हे देखील भाजपचे कार्यकर्ते असून परिसरात सामाजिक कार्य करतात. दरम्यान मागील काही दिवसांपासून काळे व गवते या गटात वादाचे प्रकार घडत आहेत. त्यातून एकमेकांविरोधात पोलिसांकडे तसेच न्यायालयात तक्रार अर्ज केले जात आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"