NMMT च्या धावत्या बसमध्ये जोडप्याची रासलीला; नको ते दृश्य कॅमेऱ्यात कैद, Video Viral झाल्यानंतर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 06:30 IST2025-04-23T06:30:29+5:302025-04-23T06:30:47+5:30

Navi Mumbai Couple Viral Video: बसमध्ये गर्दी कमी असल्याची संधी साधून मागील बाजूस हे तरुण-तरुणी बसले होते. यावेळी त्या जोडप्याचे अश्लील कृत्य सुरू होते.

Couple sex in a running NMMT bus; Unwanted scene caught on camera, case registered | NMMT च्या धावत्या बसमध्ये जोडप्याची रासलीला; नको ते दृश्य कॅमेऱ्यात कैद, Video Viral झाल्यानंतर गुन्हा दाखल

NMMT च्या धावत्या बसमध्ये जोडप्याची रासलीला; नको ते दृश्य कॅमेऱ्यात कैद, Video Viral झाल्यानंतर गुन्हा दाखल

नवी मुंबई : 'एनएमएमटी'च्या एसी बसमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या जोडप्यावर कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल व्हिडीओनंतर एनएमएमटी प्रशासनाने यासंदर्भात बसचालक व वाहकावरही कारवाई केली आहे. धावत्या बसमध्ये तरुण-तरुणीची सुरू असलेली रासलीला एका व्यक्तीने व्हिडीओ काढल्याने उघडकीस आली.

एनएमएमटीच्या पनवेल येथून कल्याणला जाणाऱ्या बसमध्ये हा प्रकार घडला. बस कामोठे येथे असताना भरचौकात बसबाहेरील व्यक्तींना बसमधील जोडप्याचे अश्लील कृत्य नजरेस पडले. बसमध्ये गर्दी कमी असल्याची संधी साधून मागील बाजूस हे तरुण-तरुणी बसले होते. यावेळी त्या जोडप्याचे अश्लील कृत्य सुरू होते.

खिडकीतून बाहेरच्यांनीही पाहिली रासलीला
बसच्या खिडकीतून संपूर्ण प्रकार बाहेरील व्यक्तींना दिसत असतानाही त्यांनी हे कृत्य केले. यावरून जोडप्यांनी बसला लॉज केल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एनएमएमटी प्रशासनाने बसच्या चालक-वाहकावर कारवाई केली आहे. सदरचे घटनास्थळ कामोठेतले असल्याने त्या जोडप्याविरोधात कामोठे पोलिसांकडे तक्रार करून गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Couple sex in a running NMMT bus; Unwanted scene caught on camera, case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.