शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी पालिका सुरू करणार तीन ओपीडी, नवी मुंबईत ७ रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 09:53 IST

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस आजाराचा धोका वाढला आहे. नवी मुंबईमधील तेरणा रुग्णालयात ४ व अपोलोमध्ये ३ रुग्ण आढळून आले आहेत. शहरात या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून महानगरपालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. 

नवी मुंबई : शहरातील दोन खासगी रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसचे ७ रुग्ण उपचार घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून मनपाने तीन ओपीडी सुरू करण्याचे निश्चित केले आहे. आजार झाल्याचे निष्पन्न झाल्यास वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.           कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस आजाराचा धोका वाढला आहे. नवी मुंबईमधील तेरणा रुग्णालयात ४ व अपोलोमध्ये ३ रुग्ण आढळून आले आहेत. शहरात या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून महानगरपालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी डॉक्टरांची बैठक घेऊन याविषयी चर्चा केली. महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली रुग्णालयात तत्काळ ओपीडी सुरू करण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीस हा आजार झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. याविषयी चाचण्याही मनपा करणार आहे. म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसल्यास रुग्णांनी तत्काळ रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे. या आजाराचा संसर्ग वेगाने पसरतो व त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. यामुळे तत्काळ उपचार सुरू करणे आवश्यक आहे.कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी व विशेषत: ज्यांना मधुमेह, किडनीचे आजार आहेत व अवयव प्रत्यारोपण केले आहे त्यांना याचा धोका जास्त आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर ते सहा आठवड्यांपर्यंत या आजाराचा धोका आहे. यामुळे महानगरपालिका कॉल सेंटरच्या माध्यमातून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची नियमित विचारपूसही करणार आहे. याशिवाय याविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे.

नवी मुंबईतील दोन खासगी रुग्णालयांत म्युकरमायकोसिसची लक्षणे असलेले काही रुग्ण उपचार घेत आहेत. मनपाने या आजारावर उपचार करण्यासाठी तत्काळ तीन ओपीडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. वाशी रुग्णालयात रुग्णांना ॲडमिट करून उपचार केले जाणार आहेत. याशिवाय व्यापक प्रमाणात जनजागृतीही केली जाणार आहे.- अभिजीत बांगर, आयुक्त महानगरपालिका

तत्काळ डॉक्टरांशी संपर्क कराम्युकरमायकोसिस हे फंगल इन्फेक्शन आहे. कोरोनामुक्त झालेल्यांना याचा धोका आहे. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे तसेच मधुमेह, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण केलेल्यांनी अधिक दक्ष राहावे. डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, दृष्टी कमी होणे, डोळ्यांतून सतत पाणी येणे, दात दुखणे किंवा हालू लागणे अशा प्रकारची लक्षणे दिसू लागल्यास वेळ न दवडता तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस