शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

Coronavirus: चाचणीसाठी होणारा विलंब थांबणार; दोन दिवसांत मिळणार कोरोनाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 04:13 IST

महापालिकेने केला खासगी लॅबशी करार

नवी मुंबई : कोरोना चाचणीसाठी लागणारा विलंब यापुढे थांबणार आहे. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी महानगरपालिकेने खासगी लॅबशी करार केला असून, यापुढे एक ते दोन दिवसांत अहवाल उपलब्ध होणार आहेत.

नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. १३ मार्चपासून शहरातील २१,३२९ जणांची स्वॅब तपासणी केली आहे. यापैकी १९,८४३ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, अद्याप १,४८६ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. वेळेत अहवाल न मिळाल्यामुळे उपचार सुरू करण्यासही विलंब होत आहे. यापूर्वी वेळेत अहवाल न मिळाल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर चार ते पाच दिवसांनी अहवाल मिळाला आहे. ५ ते १५ दिवस अहवाल मिळाला नसल्याचीही उदाहरणे आहेत. नेरुळमधील एक युवतीचा अहवाल १५ दिवसांनंतर मिळाला. अहवाल पॉझिटिव्ह आला, परंतु तोपर्यंत ती युवती पूर्णपणे बरी झाली होती. या घटनांमुळे शहरवासीयांमध्ये आरोग्य विभागाविषयी नाराजी वाढू लागली होती. ही समस्या सोडविण्यासाठी मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कृष्णा डायग्नोसिस या खासगी लॅबशी करार केला आहे. यामुळे आता एक ते दोन दिवसांत स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त होणार आहे. सदर लॅब त्यांच्या सीएसआर निधीतून शासनमान्य दरामध्ये महानगरपालिकेस सवलत देणार आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने केलेल्या कराराप्रमाणे सीसीसी, डीसीएचसी, डीसीएच कोविड रुग्णालयीन सुविधांपासून प्रतिदिन ५०० स्वॅब नमुने घेऊन जाण्याचे मान्य केले आहे.

महानगरपालिकेने स्वत:ची टेस्टिंग लॅब सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. संशयितांची शीघ्र तपासणी करण्यासाठी ४० हजार अँटिजन किट्स खरेदी करण्यात आल्या आहेत, ज्यामधून पॉझिटिव्ह व्यक्तींचे अहवाल त्वरित प्राप्त करून घेणे शक्य होणार आहे. मेट्रोपोलीस लॅबने १५ हजार स्वॅब तपासण्या मोफत करून देण्याचे मान्य केले असून, त्यांच्याकडूनही काही चाचण्या करून घेतल्या जात आहेत.वेळेत अहवाल न मिळाल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर चार ते पाच दिवसांनी अहवाल मिळाला आहे. ५ ते १५ दिवस अहवाल मिळाला नसल्याचीही उदाहरणे आहेत. नेरुळमधील एक युवतीचा अहवाल १५ दिवसांनंतर मिळाला. अहवाल पॉझिटिव्ह आला, परंतु तोपर्यंत ती युवती पूर्णपणे बरी झाली होती. या घटनांमुळे नागरिकांत आरोग्य विभागाविषयी नाराजी वाढू लागली होती. यापार्श्वभूमीवर आयुक्त मिसाळ यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस