CoronaVirus: अंगणवाडी सेविकेमुळे गर्भवती महिलेला मिळाले जीवनदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 17:18 IST2020-04-06T17:17:36+5:302020-04-06T17:18:07+5:30

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधानाने कांबळे या अंगणवाडी सेविकेने तात्काळ ऑटोरिक्षा बोलाविली आणि  आशा वर्कर सुनिता रमेश जोशी यांना सोबतीला घेऊन मंगल यांना तात्काळ आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. 

CoronaVirus: Pregnant woman receives life support due to Anganwadi service vrd | CoronaVirus: अंगणवाडी सेविकेमुळे गर्भवती महिलेला मिळाले जीवनदान 

CoronaVirus: अंगणवाडी सेविकेमुळे गर्भवती महिलेला मिळाले जीवनदान 

पनवेल : पनवेल तालुक्यातील आपटा गावात अंगणवाडी सेविका अलका अनंत कांबळे या नियमित गृहभेटीकरिता गेल्या होत्या. त्यावेळी कांबळे यांच्या लक्षात आले की,  मंगल सुनील सीद या गरोदर महिलेस प्रसूती वेदना सुरू झाल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधानाने कांबळे या अंगणवाडी सेविकेने तात्काळ  ऑटोरिक्षा बोलाविली आणि  आशा वर्कर सुनिता रमेश जोशी यांना सोबतीला घेऊन मंगल यांना तात्काळ आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल  केले. 

पुढील काही वेळातच आपटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका चव्हाण आणि नेहा गांगुर्डे तसेच आरोग्य पर्यवेक्षिका नमिता पाटील, आरोग्य सेविका कल्पना वैष्णव यांनी  मंगल यांची वैद्यकीय तपासणी केली व त्यांची यशस्वी नैसर्गिक प्रसूती केली. मंगल सीद यांची  नैसर्गिक प्रसूती होवून त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला.

बाळ व माता दोघांचीही तब्येत छान आहे.करोना विषाणूच्या या संकट काळात सबंध जग हे विलक्षण ताणतणावात आहे. एकीकडे लॉकडाऊन सुरु असताना तत्काळ या अंगणवाडी सेविकांनी कार्यतत्परता दाखविल्याने एका महिलेसह नवजात बालकाला जीवनदान मिळाले आहे. रायगड जिल्ह्यातील या अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व  आरोग्य पर्यवेक्षिका यांनी स्वतःच्या कर्तव्याची जाण ठेवून प्रसंगावधान दाखवून एका गरोदर महिलेस एक प्रकारे पुनर्जन्मच दिल्याने सर्व स्तरावरून या कर्तबगार महिलांचे कौतुक होत आहे.

Web Title: CoronaVirus: Pregnant woman receives life support due to Anganwadi service vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.