शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाची लक्षणं आहेत, पण कोरोना नाही; वेगळ्याच 'केसेस'मुळे चिंता वाढली

By कुणाल गवाणकर | Updated: October 23, 2020 09:09 IST

CoronaVirus Navi Mumbai News: रुग्णांचं प्रमाण वाढतंय; कोरोनाची लक्षणं असूनही चाचण्या मात्र निगेटिव्ह

नवी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून देशात आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील स्थितीही हळूहळू सुधारताना दिसत आहे. कोरोनाची लक्षणं आढळताच योग्य वेळी करण्यात येणाऱ्या चाचण्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वेगळीच प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राची चिंता वाढली आहे.नवी मुंबईतील एक वृद्ध व्यक्ती श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयात पोहोचली. या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली नाही. मात्र त्यांच्या शरीरात कोरोनाची लक्षणं दिसून येत होती. हाय रेजॉल्यूशन सीटी स्कॅनमध्ये त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकार यंत्रणा कोरोनाच्या विषाणूशी लढत असल्याचं दिसून आलं. त्यांच्या फुफ्फुसांच्या तपासणीतूनही तसे संकेत मिळाले.डॉक्टरांनी संबंधित व्यक्तीची दोन वेळा कोरोना चाचणी केली. त्यातून कोरोनाची लागण झाली नसल्याचं निदान झालं. आपण फेब्रुवारी-मार्चमध्ये वाराणसीसह इतर धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर काही दिवस ताप आला होता, अशी माहिती संबंधित व्यक्तीनं डॉक्टरांना दिली. त्यातून डॉक्टरांनी त्या व्यक्तीला कोरोना होऊन गेल्याचा निष्कर्ष काढला. डॉक्टरांनी त्यांनी स्टेरॉईड्स आणि इनहेलर दिलं.जूनमध्ये अशा प्रकारचं पहिलं प्रकरण डॉक्टरांकडे आलं होतं. मात्र आता अशी आणखी प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. आतापर्यंत कधीही कोरोना न झालेल्या व्यक्ती कोरोनाच्या लक्षणांसह रुग्णालयांत येत आहेत. खोकला, ताप आला होता. तो दोन-तीन दिवसांत बरा झाला, असं या व्यक्ती डॉक्टरांना सांगत आहेत.शरीरात अँटीबॉडी आढळल्यादुसऱ्यांदा लक्षणं आढळून आल्यानं या रुग्णांच्या आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्या निगेटिव्ह आल्या. मात्र अँटीबॉडी चाचण्यांमध्ये कोरोनाचा विषाणू आढळून आला. नवी मुंबईतल्या अपोलो रुग्णालयात कंसल्टंट पल्मनॉलजिस्ट असलेल्या डॉ. जयलक्ष्मी टिकेंनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे असे ३० रुग्ण आले आहेत. यातल्या बहुतांश रुग्णांना श्वास घेण्यात अडचणी येत आहेत. त्यांना फुफ्फुसाशी संबंधित त्रास होत आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी यातल्या बऱ्याच जणांना ताप आला होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या