शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CoronaVirus News : 4705 ज्येष्ठ नागरिक कोरोनामुक्त, नवी मुंबईत वृद्धांनाच मृत्यूचा सर्वाधिक धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2020 1:31 AM

CoronaVirus News in Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेस कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश येऊ लागले आहे. रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे.

- नामदेव मोरे

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ लागली आहे. यानंतरही ज्येष्ठ नागरिकांचा धोका अद्याप टळलेला नाही. मार्चपासून आतापर्यंत तब्बल ५,५५६ ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यामधील ४,७०५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये ९० ते १०० वयोगटातील तब्बल ३६ जणांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत ४८६ ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला असून, कोरोनाबळींमध्ये ५३.२३ टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेस कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश येऊ लागले आहे. रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. मृत्युदर कमी करण्यातही यश येऊ लागले आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना बसला असून अद्याप त्यांचा धोका टळलेला नाही. मृतांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी ज्येष्ठांची आत्ताही काळजी घेणे आवश्यक आहे. १३ मार्चपासून आतापर्यंत नवी मुंबईमध्ये तब्बल ४५,०३१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये ५,५५६ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये ६० ते ७० वयोगटातील सर्वाधिक ३,७३६ रुग्ण आहेत. एकूण रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण १२.३३ एवढे असले तरी मृत्यू होणाऱ्यांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण ५३ टक्के आहे. शहरात एकूण ९१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये ४८६ ज्येष्ठ नागरिक आहेत. मृतांमध्ये नवी मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे, परंतु ज्येष्ठ नागरिकांमध्ये हे प्रमाण अद्याप ८४ टक्के आहे.यामुळे कोरोनाचे प्रमाण कमी होत असले तरी ज्येष्ठ नागरिकांची यापुढेही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

शंभर वर्षाचे रुग्णही बरेज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असला तरी अनेक ज्येष्ठ नागरिक कोरोनावर मात करीत आहेत. आतापर्यंत ६० ते ७० वयोगटातील ३२५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ७० ते ८० वयोगटातील १,१६७ जण बरे झाले आहेत. ८० ते ९० वर्षे वयोगटातील २४६ व ९० ते १०० वर्षे वयोगटातील ३६ जण बरे झाले आहेत. इच्छाशक्तीच्या बळावर अनेक ज्येष्ठ नागरिक कोरोनावर मात करीत आहेत. सहव्याधी असलेल्या रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे त्यांच्यामध्ये मृत्यूचा धोका सर्वाधिक आहे. 

वयोगटानुसार रुग्णांचा तपशीलवयोगट     एकूण रुग्ण    कोरोनामुक्त     मृत्यू     शिल्लक० ते १०         २०४१          १९८३             १                 ५७११ ते २०       ३३६८             ३२६२     ५                 १०१२१ ते ३०        ८९१६             ८६२९             २०               २६७३१ ते ४०        ९८३५             ९५०५            ५०             २८०४१ ते ५०        ८३८२             ८००५             १०६             २७१५१ ते ६०        ६९३३            ६४४२            २४५             २४६६१ ते ७०       ३७३६          ३२५६             २६१             २१९७१ ते ८०      १४४७          ११६७              १६१             ११९८१ ते ९०       ३३३     २४६               ६१              २६९१ ते १००       ४०                    ३६             ३                 १

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस