Coronavirus : राज्यापेक्षा नवी मुंबईत मृत्युदर कमी, वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ केल्याचा परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 12:36 AM2020-10-31T00:36:11+5:302020-10-31T00:37:14+5:30

Coronavirus : राज्यापेक्षा नवी मुंबईचा मृत्युदर कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय सुविधांमध्ये केलेली वाढ व शुन्य मृत्युदर अभियानामुळे हे यश मिळाले आहे. आयुक्तांनी प्रत्येक केसचे ऑडिट करण्यास सुरुवात केल्यामुळेही कामगिरीमध्ये सुधारणा झाली आहे. 

Coronavirus : Mortality rate is lower in Navi Mumbai than in the state, resulting in increase in medical facilities | Coronavirus : राज्यापेक्षा नवी मुंबईत मृत्युदर कमी, वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ केल्याचा परिणाम 

Coronavirus : राज्यापेक्षा नवी मुंबईत मृत्युदर कमी, वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ केल्याचा परिणाम 

Next

- नामदेव मोरे 
नवी मुंबई : राज्यापेक्षा नवी मुंबईचा मृत्युदर कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय सुविधांमध्ये केलेली वाढ व शुन्य मृत्युदर अभियानामुळे हे यश मिळाले आहे. आयुक्तांनी प्रत्येक केसचे ऑडिट करण्यास सुरुवात केल्यामुळेही कामगिरीमध्ये सुधारणा झाली आहे. 
जुलैमध्ये नवी मुंबईमधील कोरोनाचा मृत्युदर साडेतीन टक्क्यांवर पोहोचला होता. आयुक्त अभिजीत बांगर यांनी मृत्युदर शून्यावर आला पाहिजे, अशी भूमिका घेऊन उपाययोजना सुरू केल्या. चाचण्यांची संख्या व रुग्णालयातील सुविधाही वाढविल्यामुळे मृत्युदर साडेतीन टक्क्यांवरून २.०२ वर आला आहे. 

कारण काय?
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आयसीयू, व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन बेडची संख्या वाढविली. मृत्यू झालेल्या प्रत्येक केसवर तज्ज्ञांकडून अभिप्राय घेऊन उपचारामध्ये सुधारणा केल्यामुळे मृत्युदर नियंत्रणात आला.  

मृत्युदर कमी करण्यासाठी शहरातील वैद्यकीय सुविधा वाढविण्यात आल्या. मनपा क्षेत्रातील आयसीयू, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन व जनरल बेडची संख्या वाढविली. चाचण्यांची संख्या वाढवून प्राथमिक लक्षणे वाढविले. प्राथमिक लक्षणे असतानाच रुग्ण शोधून त्यावर उपचार करण्यास प्राधान्य दिले.  सहव्याधी असणारांची विशेष काळजी घेण्यास सुरुवात केली. या सर्व उपाययोजनांमुळे मृत्युदर नियंत्रणात आणणे शक्य झाले.
- संजय कांकडे, अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका 

Web Title: Coronavirus : Mortality rate is lower in Navi Mumbai than in the state, resulting in increase in medical facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.