CoronaVirus: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ड्रोनचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 01:34 AM2020-04-25T01:34:11+5:302020-04-25T01:34:20+5:30

छतावर जमाव आढळल्यास सोसायटीवर कारवाई

CoronaVirus: Drone watch on violators | CoronaVirus: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ड्रोनचा वॉच

CoronaVirus: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ड्रोनचा वॉच

Next

नवी मुंबई : लॉकडाउन दरम्यान नियमांची पायमल्ली करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून ड्रोनचा वापर होत आहे. त्याकरिता स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. त्यांच्याकडून संशयित क्षेत्रात ड्रोनद्वारे इमारतींच्या छतावर जमणाºया जमावासह विनाकारण रस्त्याने भटकणाºयांचा शोध घेतला जात आहे. यामध्ये दोषी आढळणाºयांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

वारंवार आवाहन करूनही नागरिकांकडून जागोजागी नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. अशा व्यक्तींवर ड्रोनचा वॉच राहणार आहे. त्यानुसार पनवेल पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांनी लॉकडाउनचे पालन करून घरात राहण्याचे आवाहन पोलिसांकडून होत आहे. त्यानंतरही अनावश्यक भटकणे, इमारतीच्या छतावर एकत्र जमणे, खरेदीच्या ठिकाणी गर्दी करणे असे प्रकार सुरूच आहेत. त्यांना समज देऊनदेखील परिस्थिती सुधारत नसल्याचे दिसून येत आहे. अनेकदा अशा व्यक्तींचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येतात. पोलीस आल्याची चाहूल लागताच पळ काढला जातो. त्यावर पर्याय म्हणून पोलिसांनी आकाशातून परिसराचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्याकरिता पोलीस महासंचालक यांच्याकडून प्राप्त झालेला एक व खासगी पंधरा असे एकूण १६ ड्रोन वापरले जात आहेत. हे ड्रोन वापरासाठी मुख्यालय उपायुक्त शिवराज पाटील, सहायक आयुक्त गिरीश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस निरीक्षक, तीन कर्मचारी व १६ ड्रोन आॅपरेटर यांचे पथक तयार करण्यात आले आहे.

दिवसरात्र पथकाची गस्त
पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दिवसरात्र हे पथक गस्त घालून आवश्यक ठिकाणी ड्रोनद्वारे दूरपर्यंत हालचाली टिपणार आहे. दोषींवर गुन्हे दाखल केले जात आहेत. सोसायटीच्या छतावर जमाव आढळल्यास त्या सोसायटीवर कारवाई केली जाणार आहे.

Web Title: CoronaVirus: Drone watch on violators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.