शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: नवी मुंबईतील ८५० पोलीस कोरोनामुक्त, एकमेव कर्मचाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 01:09 IST

राज्यात कोरोनाचा हाहाकार माजलेला आहे. अशा परिस्थितीत कोरोना नियंत्रणात बंदोबस्ताची मुख्य जवाबदारी पोलिसांवर आहे. त्यानुसार, राज्यातले पोलीस दिवसरात्र बंदोबस्त करत असताना स्वत:ही कोरोनाबाधित होत आहेत.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कोरोनावर मात करण्यात नवी मुंबईपोलिसांनी यश मिळविले आहे. त्याकरिता पोलिसांच्या वेलनेस टिमचे नियोजन महत्वाचे ठरत आहे. या दरम्यान अनेक पोलिसांच्या कुटुंबांना जीवदान देण्याचे काम या टीमच्या नियोजनातून शक्य झाले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या नियोजनाचे इतरत्र कौतुक होत आहे.राज्यात कोरोनाचा हाहाकार माजलेला आहे. अशा परिस्थितीत कोरोना नियंत्रणात बंदोबस्ताची मुख्य जवाबदारी पोलिसांवर आहे. त्यानुसार, राज्यातले पोलीस दिवसरात्र बंदोबस्त करत असताना स्वत:ही कोरोनाबाधित होत आहेत. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे, नवी मुंबई पोलीस दलात सुमारे ४,५०० अधिकारी व कर्मचारी आहेत. नवी मुंबई पोलिसांच्या नियोजनबद्ध आखणीमुळे सुमारे ८५० पोलीस व त्यांचे सुमारे ५०० नातेवाईक कोरोनामधून सुखरूप बाहेर येऊ शकले आहेत.नवी मुंबई पोलिसांकडून बंदोबस्त सुरू असताना, त्यांना कोरोनाची लागण झाल्यास तातडीने उपचार मिळावेत, यासाठी वेलनेस टीम तयार करण्यात आलेली आहे. मुख्यालय उपायुक्त शिवराज पाटील, विशेष शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे व सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या नियोजनाखाली ही टीम कार्यरत आहे. त्यामध्ये आठ ते दहा निरीक्षकांच्या समावेश आहे. एकाद्या अधिकारी अथवा कर्मचाºयाला कोरोना होऊन प्रकृती खालावल्यास उपचारासाठी डॉ.डी.वाय. पाटील, तसेच इतर रुग्णालयात सोय करण्यात आली आहे, तर क्वारंटाइन व किरकोळ उपचारासाठी नेरुळ व कळंबोली येथे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. सध्या तेथे सुमारे १५० पोलिसांवर उपचार सुरू आहेत.रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यास कोरोना होऊन जिवाला धोका उद्भवू शकतो. यामुळे मार्च महिन्यातच नवी मुंबई पोलीस दलातील ५५ वर्षांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदोबस्तातून वगळण्यात आले. त्याशिवाय जे अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त करत आहेत, त्यांना रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी औषधे, तसेच काढा पुरविण्यात आला. यामुळे सतत बंदोबस्तावर राहून अनेक जण कोरोनापासून सुरक्षित राहिले आहेत.वेलनेस टीमचे असे चालते कामएखाद्या कर्मचाºयाला लागण झाल्यास तो पूर्ण बरा होऊन घरी जाईपर्यंत वेलनेस टीम पाठपुरावा करते. त्याकरिता रोज डॉक्टरांसोबत सुसंवाद साधला जाऊन प्रत्येक पोलिसांच्या प्रकृतीची चौकशी केली जाते. एखाद्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यास तत्काळ रुग्णालयात दाखल करून पुढील उपचार दिले जात आहेत.या दरम्यान कोणाला आवश्यक औषधांची कमी भासणार नाही, याचीही खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे. शिवाय कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या प्रत्येकाची वरिष्ठांकडून चौकशी केली जात असल्याने, त्यांनाही दिलासा मिळत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस