शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

पहिल्या टप्प्यात 17 हजार योद्ध्यांना लस; वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 01:09 IST

corona virus : कोविड लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात टास्क फोर्स सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड लसीकरणाचा पहिला टप्पा राबविण्याच्या दृष्टीने महापालिकेने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे १७ हजार कोविड योद्ध्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यात आरोग्य सेवेशी निगडित नवी मुंबई पालिका तसेच खाजगी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, कर्मचारी, आशा, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आदींचा समावेश करण्यात आला आहे.कोविड लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात टास्क फोर्स सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी लसीकरणाची सुयोग्य कार्यवाही पार पाडण्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले. या बैठकीस वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, उपआयुक्त क्रांती पाटील, सहा. आयुक्त संध्या अंबादे, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. अरुण काटकर, यूएनडीपीचे प्रतिनिधी गौतम कांबळे यांच्यासह जिल्हा लसीकरण अधिकारी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी सादरीकरणाद्वारे लसीकरण मोहीम राबविण्यासाठी आवश्यक बाबींची तसेच महापालिकेच्या वतीने केलेल्या तयारीची माहिती दिली. पहिल्या टप्प्यात नवी मुंबई महापालिकेच्या ४२ केंद्रांमधील ४,४९० कर्मचारी तसेच खाजगी वैद्यकीय क्षेत्राशी निगडित ९०४ संस्थांतील १२,४३१ कर्मचाऱ्यांची महापालिकेकडे संगणकीकृत नोंद करण्यात आली आहे. लसीकरण सुरू झाल्यानंतर नोंदणी झालेल्या व्यक्तीस लसीकरणाचा दिवस व स्थळाबाबत त्याने नोंदणी केलेल्या मोबाइलवर मेजेस येणार आहे. लसीकरण झाल्यानंतर प्रमाणपत्र मोबाइलवर प्राप्त होणार आहे. लसीकरण स्थळाच्या रचनेमध्ये प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष स्वतंत्र असणार असून, प्रत्येक पथकामध्ये ४ व्हॅक्सीनेशन ऑफिसर व १ व्हॅक्सीनेटर ऑफिसर यांचा समावेश आहे. एका केंद्रावर दररोज १०० व्यक्तींना लस देणार आहे.

अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणया लसीकरण मोहिमेसाठी राज्य तसेच जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले असून नवी मुंबई रपालिका स्तरावरही १७ डिसेंबर रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले आहे. २२ डिसेंबर रोजी कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. लसीकरण झाल्यानंतरही वारंवार हात धुणे अथवा सॅनिटायझरचा वापर करणे तसेच मास्क घालणे व सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन बंधनकारक आहे. सर्व संबंधित संस्थांनी आवश्यकतेनुसार अपेक्षित मनुष्यबळ तसेच लसीकरणासाठी जागा अशा पूरक बाबी उपलब्ध करून द्याव्यात, असे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सूचित केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई