पतसंस्थेविरोधात महावितरणची फसवणुकीची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 23:54 IST2019-01-04T23:53:48+5:302019-01-04T23:54:00+5:30
वीज बिल भरणा केंद्रासाठी नेमलेल्या पतसंस्थेने ग्राहकांची जमा रक्कम वेळेत न भरल्याप्रकरणी महावितरणने वाशी व नेरूळ पोलिसांकडे तक्रार केली आहे.

पतसंस्थेविरोधात महावितरणची फसवणुकीची तक्रार
नवी मुंबई : वीज बिल भरणा केंद्रासाठी नेमलेल्या पतसंस्थेने ग्राहकांची जमा रक्कम वेळेत न भरल्याप्रकरणी महावितरणने वाशी व नेरूळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. तक्रारीनंतर दुसऱ्या दिवशी पतसंस्थेद्वारे शिल्लक रक्कम महावितरणच्या खात्यात जमा केली आहे.
एका सहकारी पतसंस्थेद्वारे ग्राहकांकडून जमा झालेली वीज बिलाची ३९ लाख ८३ हजार रुपयांची रक्कम महावितरणच्या खात्यात जमा केलेली नव्हती.
यासंदर्भात २ जानेवारीला महावितरणच्या अधिकाºयांनी नेरूळ व वाशी पोलिसांकडे सदर पतसंस्थेविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. तो अपहार महावितरणमध्ये झाला नसून महावितरणने नेमलेल्या पतसंस्थेकडून झाल्याचे महावितरणद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.