पैशासाठी बार कर्मचाऱ्यांकडून सहकाऱ्याचीच हत्या; पैसे लुटताना विरोध केल्याने घेतला जीव 

By सूर्यकांत वाघमारे | Published: December 20, 2023 05:58 PM2023-12-20T17:58:23+5:302023-12-20T17:58:36+5:30

शिरवणे येथील भारती बारच्या वेटरची हत्या झाल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली.

Colleague killed by bar staff for money He took his life by protesting while looting money | पैशासाठी बार कर्मचाऱ्यांकडून सहकाऱ्याचीच हत्या; पैसे लुटताना विरोध केल्याने घेतला जीव 

पैशासाठी बार कर्मचाऱ्यांकडून सहकाऱ्याचीच हत्या; पैसे लुटताना विरोध केल्याने घेतला जीव 

नवी मुंबई : शिरवणे येथील भारती बारच्या वेटरची हत्या झाल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. बारच्या वरच्या भागातच मृत कामगावर व इतर कामगार रहायला आहेत. हत्या झालेल्या कामगाराकडे भरपूर पैसे असल्याच्या समजुतीमधून सहकाऱ्यांनीच त्यांची हत्या केली. उदय शेट्टी असे मृत वेटरचे नाव आहे. बुधवारी सकाळी तो राहत्या खोलीमध्ये मृत अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. यावेळी घरातील वस्तू विस्कटलेल्या अवस्थेत आढळल्या. शिवाय त्याठिकाणी राहणारे इतर काही कर्मचारी बेपत्ता झाल्याचे आढळून आले. यावरून वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी तातडीने तपास पथक तयार करून त्यांचा शोध घेतला. 

त्यामध्ये दुपारच्या सुमारास तिघे हाती लागले आहेत. यामध्ये त्यांनी लुटीच्या उद्देशाने उदय शेट्टी याची हत्या केल्याची कबुली दिली आहे. वेटरचे काम करणाऱ्या उदय शेट्टी याच्याकडे अनेक वर्षांपासूनची कमाई साठून असल्याचा त्यांना संशय होता. तो कधी गावी गेला नसल्याने व पैशाची उधळपट्टी नसल्याने सर्व पैसे राहत्या घरातील तिजोरीत असावा असे त्यांना वाटले होते. यावरून मंगळवारी रात्री त्यांनी त्याला मारहाण करून कपाटाची चावी मिळवली. परंतु उदय शेट्टीने त्यांना तीव्र प्रतिकार केल्याने त्यांनी त्याच्या डोक्यात स्टंप मारला. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला असता त्यांनी त्याची रोकड घेऊन पळ काढला. दरम्यान त्यांनी किती रोकड चोरली व हाणामारी मागे इतर काही उद्देश होता का ? याचा अधिक तपास नेरुळ पोलिस करत आहेत. 

Web Title: Colleague killed by bar staff for money He took his life by protesting while looting money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.