नायझेरियनकडून साडेपाच लाखाचे कोकेन जप्त, खारघर पोलिसांची कारवाई
By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 17, 2023 17:01 IST2023-09-17T17:01:06+5:302023-09-17T17:01:21+5:30
खारघर सेक्टर ३४ येथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी नायझेरियनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायझेरियनकडून साडेपाच लाखाचे कोकेन जप्त, खारघर पोलिसांची कारवाई
नवी मुंबई : नाकाबंदी दरम्यान पोलिसांना चकमा देऊन पळणाऱ्या नायझेरियनकडून ५ लाख ७० हजाराचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. खारघर सेक्टर ३४ येथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी नायझेरियनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी खारघर सेक्टर ३४ येथे खारघर पोलिसांमार्फत नाकाबंदी सुरु होती. त्याठिकाणी वरिष्ठ निरीक्षक राजीव शेजवळ यांच्यासह सहायक निरीक्षक दत्तात्रय पवार यांचे पथक होते. नाकाबंदी दरम्यान मोटरसायकलवर आलेला एक नायझेरियन व्यक्ती पोलिसांना पाहून पळू लागला. यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
यावेळी तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याची अंगझडती घेतली असता खिशामध्ये ५७ ग्रॅम कोकेन आढळून आले. त्याची किंमत ५ लाख ७० हजार रुपये आहे. याप्रकरणी इग्ब्लूम ओकेचुकी या नायझेरियन व्यक्तीवर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो तळोजाचा राहणारा आहे.