मसाला व्यापाऱ्यांचा बंद

By Admin | Updated: June 22, 2016 02:18 IST2016-06-22T02:18:20+5:302016-06-22T02:18:20+5:30

नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईला विरोध करण्यासाठी मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सोमवारी लाक्षणिक बंदचे आयोजन केले होते. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Closed masala merchants | मसाला व्यापाऱ्यांचा बंद

मसाला व्यापाऱ्यांचा बंद

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईला विरोध करण्यासाठी मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सोमवारी लाक्षणिक बंदचे आयोजन केले होते. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. साखर व नारळ व्यापाऱ्यांनी दिवसभर व्यापार सुरूच ठेवला होता.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे. अतिक्रमण हटविताना विरोध करणाऱ्या ३१ व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांनी एक दिवसाच्या लाक्षणिक बंदचे आयोजन केले होते. या बंदमध्ये पालिकेने कारवाई केलेल्या डी विंगसह इतर मसाला व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. परंतु साखर व नारळ व्यापारी आंदोलनामध्ये सहभागी झाले नाहीत. यामुळे शंभर टक्के मार्केट बंद ठेवण्यात मसाला व्यापाऱ्यांना अपयश आले आहे.
महानगरपालिकेने सुरू केलेल्या कारवाईविरोधात व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली आहे. सोमवारी सील केलेल्या काही गाळ्यांचे सील काढण्यास अनुमती दिली आहे. मंगळवारी पुन्हा या याचिकेवर सुनावणी होणार आहे. व्यापाऱ्यांनी अचानक केलेल्या बंदविषयी बाजार समिती परिसरामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. अतिक्रमण वाचविण्यासाठी व्यापारी दबावतंत्राचा वापर करत असून अशा प्रकारे नागरिकांना वेठीस धरू नये, असे मत व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Closed masala merchants