शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीए बंदर परिसरात रासायनिक टँकरच्या साफसफाईचा उरणच्या पर्यावरणाला धोका

By नारायण जाधव | Updated: June 18, 2024 16:57 IST

रसायनमिश्रित पाण्याने काही ठिकाणी मासे मृत्यू पावतात तर काही ठिकाणी माती प्रदूषित होते

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : येथील जेएनपीए बंदर परिसरात अनेक ठिकाणी असलेल्या सर्व्हिस सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात रसायनांचे टँकर धुण्यात येत आहेत. मात्र, पर्यावरणाला हानीकारक असलेल्या या कृत्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी आणि मच्छीमारांनी टँकर धुतल्यानंतर बाहेर फेकल्या जाणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यामुळे कुठे मासे मरत असल्याची तर कुठे माती प्रदूषित होत असल्याची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

जेएनपीए कंटेनर फ्रेट स्टेशनजवळील सोनारी येथील अशाच एका सेवा केंद्रात दररोज किमान १० टँकर स्वच्छ केले जातात, असे महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जेएनपीए परिसरात अशी अनेक टँकर सेवा केंद्रे आहेत जिथून घातक रसायनांचे टँकर धुतले जात असून त्या माध्यमातून घातक रसायने थेट खाडीत जात असल्याने मोठ्या प्रमाणात मासे मारले जात असल्याचे ते म्हणाले.

दोषींवर कारवाई हवी

रसायनांचे टँकर धुण्याचे प्रकार नियमित अंतराने घडत असून याचा परिसरातील जैवविविधतेवर परिणाम होतो, असे हितेश कोळी, अध्यक्ष - गव्हाण कोळीवाडा, फिशिंग सोसायटी यांनी सांगितले. यामुळे यातील दोषींवर तत्काळ एफआयआर दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

पर्यावरणाचीही हानी

रसायनांचे टँकर अशाप्रकारे कोणतेही नियमांचे पालन न करता उघड्यावर धुण्याचे प्रकार गंभीर असून यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाने पर्यावरणाची हानी होत असल्याचे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ई मेलमध्ये म्हटले आहे.

मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम

भरती-ओहोटी आणि कमी भरतीच्या प्रवाहासह, रसायने ओलसर जमिनीपर्यंत पोहोचतात आणि शेवटी खाडीत आणि जिथे बरेच मासे मारतात. या बेकायदेशीर प्रक्रियेचा केवळ मासेमारी समुदायाच्या दैनंदिन व्यापारावर परिणाम होत नाही तर मातीसुद्धा प्रदूषित होत आहे, असे कुमार म्हणाले. यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली. वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी अशा घटनांकडे डोळेझाक करत आहेत. अशा घटनांमुळे पारंपरिक मच्छिमारांना मोठी किंमत मोजावी लागत असून त्यांच्या उपजीविकेचे पारंपरिक साधन संपत चालले असल्याचे नंदकुमार पवार म्हणाले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईJNPTजेएनपीटीuran-acउरण