शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

जेएनपीटीच्या सुरक्षायंत्रणेवर प्रश्नचिन्ह; खासगीकरण येत आहे अंगाशी 

By नारायण जाधव | Updated: July 17, 2022 05:39 IST

जेएनपीटी बंदराच्या सुरक्षायंत्रणा आणि तेथील एकंदरीतच सीमा शुल्क, उत्पादन  शुल्क,  स्थानिक पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करणार आहे.

नारायण जाधव

नवी मुंबई : नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री पनवेलनजीकच्या एका कंटेनर यार्डमधून ३६२.५९ कोटी रुपयांचे शु्द्ध हेरॉईन जप्त केले आहे. दुबईमधून आलेल्या कंटेनरमध्ये ते लपवलेले होते. धक्कादायक म्हणजे या कंटेनरचा ताबा कोणीच न घेतल्याने सहा-सात महिन्यांपासून तो माल कस्टमच्या ताब्यात होता. यामुळे हा प्रकार संबंधित कंटेनर देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या बंदरातून बाहेर स्कॅन करून बाहेर आला, त्या जेएनपीटी बंदराच्या सुरक्षायंत्रणा आणि तेथील एकंदरीतच सीमा शुल्क, उत्पादन  शुल्क,  स्थानिक पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करणार आहे.

तसे पाहिले तर तस्करी आणि जेएनपीटीचे नाते खूप जुने आहे. यापूर्वीही येथे विविध वस्तू, हत्यारे आणि अमली पदार्थ तस्करीचे अनेक प्रकार उघड झाले आहेत. मात्र, तरीही संरक्षण आणि गृहखात्याने बोध घेतलेला दिसत नाही. गुरुवारी पकडलेल्या ७२ किलो ५१८ ग्रॅमच्या १६८ हेरॉईनच्या पॅकेटचा साठा महामुंबईतील अमली पदार्थांची तस्करीची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे सांगणारा आहे.  प्रतिकिलो ५ कोटीप्रमाणे त्याची सुमारे ३६२ कोटी ५९ लाख रुपये किंमत असल्याचे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग आणि उपायुक्त  सुरेश मेंगडे यांनी सांगितले आहे. 

परदेशातून नवी मुंबईमार्गे पंजाबमध्ये ड्रग्स पुरवले जाणार असल्याची माहिती पंजाब पोलिसांच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलला मिळाली होती. त्यामुळे या पथकाचे प्रमुख कोमलप्रीत सिंग यांनी नवी मुंबई पोलिसांची मदत घेऊन शोधमोहीम राबवून हेरॉईनचा हा साठा जप्त केला. त्यांनी ही माहिती दिली नसती तर हा प्रचंड साठा महामुंबईतील तरुणाईला नशेच्या खाईत ढकलण्यासाठी तस्करांनी वापरला असता.आतापर्यंत जेएनपीटी बंदरातून सर्वाधिक रक्तचंदन, काडतुसे, विदेशी दारू, वन्यप्राण्यांची कातडी, चरस, गांजा, अफू आदींची तस्करी झाली आहे. गेल्या अनेक वर्षांत शेकडो टन रक्तचंदनाची तस्करी उघड झाली आहे. 

मागे एकदा दुबईहून खजूर भरून आणल्याचे दाखवून परदेशी बनावटीच्या ११ कोटी ८८ लाख रुपये किमतीच्या विदेशी सिगारेटही महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केल्या होत्या.

खासगीकरण येत आहे अंगाशी 

जेएनपीटी बंदरातील एकामागून एक सर्व बंदरांचे आता खासगीकरण झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वीच शेवटचे बंदरही खासगी कंपनीच्या ताब्यात गेले आहे. ती एकमेव देशी कंपनी आहे. उर्वरित विदेशी कंपन्या आहेत.  तेथील सुरक्षायंत्रणेवर त्यांचे नियंत्रण आपल्या ताब्यात कसे राहील, हे त्या कंपन्या पाहतात. यामुळे तस्करी  वाढत आहे. आलेले कंटेनर हे सहा-सात महिन्यांपासून सीमा शुल्क विभागाच्या ताब्यात असूनही त्यांना थांगपत्ता लागू नये, ही अतिशय गंभीर आणि देशाच्या सुरक्षेशी खेळणारी बाब आहे. याकडे केंद्रीय संरक्षण आणि गृह विभागाने गांभीर्याने पाहायला हवे.

छोटा राजनने ऑइलच्या ड्रममधून मागविली हत्यारे 

- छोटा राजनने ऑइलच्या ड्रममधून विदेशातून ३४ फॉरेन मेड रिव्हॉल्वर, तीन पिस्तुल आणि १२८३ काडतुसे मागविली होती. 

- तेव्हाच जेएनपीटी बंदराच्या सुरक्षायंत्रणेवर मोठी टीका झाली होती. यानंतर येथील कंटेनर स्कॅनरची संख्या वाढविली होती. 

- तपासणी यंत्रणा अधिक सक्षम केली होती. परंतु, ती आता फोल ठरले आहे.

टॅग्स :JNPTजेएनपीटीNavi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी