शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

कोरोनाकाळात शहरात ५० हजार टन ऑक्सिजनचा वापर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:48 AM

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाली होती. परंतु दिवाळीनंतर पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे.

 नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. मनपाच्या रुग्णालयात मार्चपासून सातपट जास्त ऑक्सिजनचा वापर वाढला आहे. सात महिन्यांत तब्बल ५० हजार टन वापर झाला असून सर्वाधिक १२,७५७ टन ऑक्सिजन सप्टेंबरमध्ये वापरात आला आहे. 

नवी मुंबईमध्ये १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. यानंतर महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता भासू नये यासाठी खासगी रुग्णालयांचीही मदत घेण्यास सुरुवात केली. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचे डेडिकेटेड कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यात आले. सुरुवातीच्या काळात ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेडची कमतरता भासू लागली. रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारीही वाढू लागल्या होत्या. रुग्णसंख्याही झपाट्याने वाढू लागल्यामुळे महानगरपालिकेने नवीन रुग्णालय उभारण्यास प्राधान्य दिले. सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १२०० बेडचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात आले. तेथे ४८३ ऑक्सिजन बेडची निर्मिती केली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निर्यात भवनमध्ये ५०३ व राधास्वामी सत्संग भवनमध्ये ४०८ ऑक्सिजन युनिटची निर्मिती केली.  कोणालाही कमतरला भासणार नाही याची काळजी घेतली. 

पालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना सुरू होण्यापूर्वीच रुग्णालयांना ऑक्सिजन पुरविण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली असल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासली नाही. मार्चच्या तुलनेमध्ये सप्टेंबरमध्ये तब्बल सात पट मागणी वाढली. अनेक रुग्णांना प्रतिदिन ५ ते १५ लीटर ऑक्सिजन पुरवावा लागत होता. त्यापेक्षा जास्त आवश्यकता भासली की संबंधित रुग्णास आयसीयू व व्हेंटिलेटर्स युनिटमध्ये पाठविण्यास सुरुवात केली. सद्य:स्थितीमध्ये नवी मुंबईमधील खासगी व मनपाच्या रुग्णालयांमध्ये १,२३३ जण उपचार घेत आहेत. यामधील ८९३ जणांना ऑक्सिजन द्यावा लागत आहे. सप्टेंबर व ऑक्टोबरच्या तुलनेमध्ये नोव्हेंबरमध्ये मागणी कमी झाली आहे. परंतु दुसरी लाट आली तर पुन्हा ऑक्सिजनची मागणी वाढू शकते. 

महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाली होती. परंतु दिवाळीनंतर पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे नजीकच्या काळात दुसरी लाट आली तर सर्व रुग्णांवर योग्य उपचार करता यावेत. त्यांना ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत व्हावा यासाठी मनपाने पुरेसी व्यवस्था केली आहे. शहरातील मनपा व खासगी रुग्णालयांमध्ये ४५७ आयसीयू बेड, २१७६ ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध असून, मनपाच्या चार प्रमुख रुग्णालयांमध्येही पुरेसे ऑक्सिजनची सुविधा असलेले बेड उपलब्ध आहेत.