शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

नवी मुंबई उद्यानांचे शहर, विरंगुळ्याची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 03:00 IST

स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईची ओळख उद्यानांचे शहर म्हणूनही होऊ लागली आहे. महापालिकेतर्फे प्रत्येक नोडमध्ये उभारण्यात आलेली छोटी-मोठी तब्बल २४३ उद्याने त्याचे प्रमुख कारण ठरत आहेत.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई  - स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईची ओळख उद्यानांचे शहर म्हणूनही होऊ लागली आहे. महापालिकेतर्फे प्रत्येक नोडमध्ये उभारण्यात आलेली छोटी-मोठी तब्बल २४३ उद्याने त्याचे प्रमुख कारण ठरत आहेत. त्यापैकी १६३ उद्याने प्रशस्त आकाराची असून, त्यात नेरुळच्या संत गाडगेबाबा उद्यान, वंडर्स पार्क व घणसोलीतील सेंट्रल पार्कसह इतर उद्यानांचा समावेश आहे.सिडकोने उद्यानांसाठी राखीव ठेवलेल्या जागेचे सोने करण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून मागील २७ वर्षांत झाले आहे. त्यानुसार सद्यस्थितीला शहरात तब्बल २४३ उद्याने विकसित करण्यात आली असून, त्यापैकी १६३ उद्याने मोठ्या आकाराची आहेत, तर पाच उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी टॉय ट्रेनसह इतर खेळण्यांचीही सुविधा पुरवण्यात आलेली आहे. तर ८० ठिकाणच्या मोकळ्या जागांमध्ये उद्यानांसारखीच हिरवळ करण्यात आलेली आहे.उद्यानांच्या माध्यमातून शहरात हिरवळ तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या निधीमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या निधीसह पालिकेच्याही निधीचा समावेश आहे. त्याशिवाय पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेल्या रकमेचाही वापर उद्यान विकसित करण्यासाठी झालेला आहे. त्यात नेरुळचे संत गाडगेबाबा उद्यान म्हणजेच रॉक गार्डनचा समावेश आहे. हे उद्यान स्वच्छतेचे प्रतीक म्हणूनही ओळखले जाते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पालिकेला पुरस्कार स्वरूपात एक कोटीचे बक्षीस मिळाले होते. त्या रकमेतून हे उद्यान उभारून त्यास संत गाडगेबाबा उद्यान नाव देण्यात आले. तर कोपरी येथील अम्युझमेंट पार्कही संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत आहे.नेरुळच्या वंडर्स पार्कमध्ये जगभरातील आश्चर्यकारक वास्तूंच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. तर कोपरखैरणेतील निसर्ग उद्यान हे जुन्या डम्पिंग ग्राउंडवर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून तयार करण्यात आला आहे. तर नुकतेच घणसोलीत उभारण्यात आलेले सेंट्रल पार्क शहराच्या वैशिष्ट्यात भर टाकणारे ठरणार आहे. त्या ठिकाणी त्यांना स्केटिंगसह स्विमिंगचाही मनसोक्त आनंद घेता येणार आहे. स्विमिंग पुलाची सुविधा असलेले पालिकेचे हे एकमेव उद्यान आहे.स्मृती उद्यान जपणार आठवणीनागरिकांच्या सुख-दु:खाच्या आठवणीतून वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नेरुळच्या ज्वेल्स आॅफ नवी मुंबई लगतच्या जागेत स्मृती उद्यान विकसित केले जाणार आहे. त्या ठिकाणी नागरिकांना त्यांच्या सुख-दु:खाच्या आठवणीत वृक्ष लावून ते जपण्याची संधी दिली जाणार आहे, तर अशा प्रत्येक झाडाला संबंधिताचे नावही दिले जाणार आहे, त्यामुळे हे उद्यान शहरवासीयांचे आकर्षण ठरणार आहे.पालिकेच्या माध्यमातून शहरातील उद्यानांसाठी आरक्षित जागांवर तसेच मोकळ्या जागांवर उद्यानांचा विकास करण्यात आला आहे. त्यापैकी काही उद्याने थिम पार्क संकल्पनेतून बनवण्यात आली आहेत. तर काही उद्यानांमध्ये लहान मुलांच्या खेळण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रत्येक विभागातील या उद्यानांच्या माध्यमातून स्थानिक रहिवाशांच्या विरंगुळ्याची सोय उपलब्ध झालेली आहे.- नितीन काळे, पालिका उपआयुक्तराखीव असलेल्या भूखंडावर उद्यानांचा विकास करण्याबरोबरच काही मोकळे भूखंड व नाल्यालगतच्या जागेतही हिरवळ तयार करून पालिकेने त्या ठिकाणी नागरिकांच्या विरंगुळ्याची सोय केलेली आहे. त्यामध्य ८० मोकळ्या जागांसह सात चौक व आठ ट्री बेल्टचा समावेश आहे, त्यानुसार १६३ मोठी उद्याने व ८० मोकळ्या जागा अशा २४३ ठिकाणच्या ११ लाख एक हजार ८८४ चौ.मी. क्षेत्रफळाच्या जागेत हिरवळ तयार केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई