तळोजामधील पाण्याच्या समस्यांबाबत नागरिक छेडणार चप्पल दिखाओ आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 18:54 IST2024-02-11T18:53:58+5:302024-02-11T18:54:15+5:30
फेडरेशनच्या बैठकीत सोसायटीतर्फे निर्णय.

तळोजामधील पाण्याच्या समस्यांबाबत नागरिक छेडणार चप्पल दिखाओ आंदोलन
वैभव गायकर , पनवेल: मागील दहा दिवसापासून तळोजा नोड मधील पाण्याची समस्या गंभीर बनली असल्याने येथील रहिवाशांनी यासमस्येबाबत जण आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे. दि.11 रोजी सेंटर पॉइंट बिल्डिंग तळोजा फेज 1 या ठिकाणी झालेल्या बैठकीत प्रशासनाविरोधात चप्पल दिखावो आंदोलन छेडण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
या बैठकीला 80 सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.उपस्थित त्रस्त नागरिकांनी पाण्या अभावी सोसाव्या लागणाऱ्यायातना बोलून दाखवल्या आणि पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर सिडको बेलापूर कार्यालयावर त्रस्त नागरिकांयचे निषेधात्मक "चप्पल दिखाओ आंदोलन" करण्याचा प्रस्ताव सर्व मताने मंजूर करण्यात आला. नागरिकांच्या सह्याचे निवेदन दोन दिवसात सिडको कार्यालय पाणीपुरवठा विभाग आणि पोलीस प्रशासनाला देण्यात येणार असल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांनी सांगितले .