शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पनवेलमध्ये दहा दिवसांनी लॉकडाऊन वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 11:56 PM

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या वर पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत.

- वैभव गायकर ।पनवेल : महानगरपालिका क्षेत्रात १४ ते २४ जुलैदरम्यान दहा दिवसांचा पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही दहा दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला होता, परंतु त्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होत नसेल, तर कशाला हवा आहे, अशी प्रतिक्रिया पनवेलकरांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पडसाद उमटताना दिसत आहेत.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या वर पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊन कायम राहिले, तर भविष्यात परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. एकीकडे घरभाडे व इतर खर्च सुरू असताना किती दिवस घरी बसणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. व्यापारी वर्गही कमालीचा हैराण झाला आहे. अशाप्रकारे लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करण्याची गरज होती, असे मत होलसेल पनवेल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश मीरानी यांनी व्यक्त केले आहे. सर्वच जण आपल्या घरी अन्नधान्याचा साठा करतात, असा प्रकार नाही. हातावर पोट असणारे अनेक जण रोज सामान भरत असतात. अशा नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याचे मीरानी म्हणाले. कोविडच्या काळात कर्मचाºयांचा तुटवडा भासत असताना आम्ही घरपोच सामान देऊ शकत नाही. प्रशासनाने सामान लोडिंग अनलोडिंगला परवानगी देणे गरजेचे आहे. त्यातच लॉकडाऊन वाढविताना नागरिक, तसेच व्यापारी वर्गाला पुन्हा एकदा ठरावीक वेळ देण्याची गरज होती. मात्र, तसे झाले नसल्याने पुन्हा एकदा जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित झाल्याचे मीरानी यांचे म्हणणे आहे. दि होलसेल पनवेल मर्चंट असोसिएशन व पनवेल व्यापारी संघटना (किरकोळ) या दोन्ही संघटनांमध्ये रिटेल व खाद्यपदार्थांसह इतर व्यवसाय करणाºया ३५० ते ४०० व्यापाºयांचा समावेश आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांची, तसेच व्यापाºयांची गैरसोय होणार नाही, याबाबत पालिके ने विचार करणे गरजेचे असल्याचे मीरानी म्हणाले.लोकप्रतिनिधींनीही या लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. शेकाप नगरसेवक हरेश केणी यांनी याबाबत आयुक्त सुधाकर देशमुख यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले गेले नाही. लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नसल्याचे केणी यांनी स्पष्ट केले.भाज्या खरेदीसाठी धावाधाव : गर्दी टाळण्यासाठी पालिकेने काउंटर विक्री बंद केली असली, तरी अनेक जण भाज्या, फळांच्या खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. अशा वेळी उघड्यावर विक्रीला बंदी असल्याने पोलीस अथवा पालिका कर्मचारी येताच, फेरीवाल्यांसह नागरिकांची मोठी धावाधाव होत आहे.सोशल मीडियावर नेटकºयांचा उद्रेकदहा दिवसांनी लॉकडाऊन वाढवल्याचे कळताच सोशल मीडियावर या लॉकडाऊनच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत, नोकºया गेल्या, अनेकांना रोजगाराचा प्रश्न सतावत आहे. नव्याने सुरुवात करण्यासाठी लॉकडाऊन शिथिलता होेण्याची गरज असल्याचे नागारिकांचे म्हणणे आहे.महापालिकेचे नागरिकांना अवाहनकोरोनाच्या नियंत्रणासाठी पालिकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे अवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. चाचण्या घेण्याचे प्रमाण वाढले असले, तरी मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढली नसल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :panvelपनवेल