स्वच्छतेसाठी सिडकोचे पाऊलकळंबोली :

By Admin | Updated: October 1, 2015 23:51 IST2015-10-01T23:51:03+5:302015-10-01T23:51:03+5:30

सिडको वसाहतीत मिटकॉनची नियुक्ती केल्यापासून कचऱ्याचा प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघू लागला आहे. नियमित कचरा उचलण्यापासून रस्त्यावर तसेच कचराकुंडीभोवती पडणारा कचरा

Cidco's Jalakalamboli for cleanliness: | स्वच्छतेसाठी सिडकोचे पाऊलकळंबोली :

स्वच्छतेसाठी सिडकोचे पाऊलकळंबोली :

सिडको वसाहतीत मिटकॉनची नियुक्ती केल्यापासून कचऱ्याचा प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघू लागला आहे. नियमित कचरा उचलण्यापासून रस्त्यावर तसेच कचराकुंडीभोवती पडणारा कचरा त्वरित उचलण्याकरिता सिडकोने पावले उचलली आहेत. मिटकॉनने दिलेल्या प्रस्तावानुसार महत्त्वाच्या ठिकाणी कचरा पडल्यानंतर तो त्वरित जमा करून उचलण्याकरिता खास यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. नवीन पनवेलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर अभियान हाती घेतले असून ते यशस्वी होत आहे. त्यामुळे दुर्गंधी कमी होवून पूर्वीप्रमाणे स्वच्छतेचा बोजवारा उडत नसल्याच्या प्रतिक्रि या येत आहेत.
सिडको वसाहतीत कचरा उचलण्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या बीव्हीजी कंपनीकडून घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार काम होत नव्हते. खांदा वसाहत आणि नवीन पनवेलमध्ये तर उघड्या गाडीतून कचरा नेला जात असे. या वसाहतीत कधीच कॉम्पॅक्टर येत नसल्याचे नागरिकांच्या अनेक तक्र ारी येत होत्या. ती गाडी सुध्दा नियमित वेळेत येत नसे. कॉम्पॅक्टरच्या साह्याने कचरा वाहून नेणे बंधनकारक असताना ते पाळले जात नव्हते. त्यामुळे रस्त्यावर, कचरा कुंड्याच्या आजूबाजूला कचरा साठून सगळीकडे दुर्गंधी पसरत होतीच त्याचबरोबर रोगराई सुध्दा फैलावत असे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले. मध्यंतरी व्यवस्थापकीय संचालकांनी घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी इंजिनिअरिंग सेक्शनला दिली. त्याबरोबर यावर देखरेख ठेवण्याकरिता मिटकॉन या एजन्सीची नियुक्ती केली. मिटकॉनने प्रत्येक नोडनुसार अधिकारी, आरोग्य निरीक्षक नियुक्त घनकचरा व्यवस्थापन, घंटागाडीस साफसफाई या सर्व गोष्टीचे एक प्रकारे लेखापरीक्षण केले. याबाबत येणाऱ्या त्रुटी, संबंधित कंपनीकडून होणारी दिरंगाई या सर्व गोष्टी प्रशासनापर्यंत पोहचिवण्याचे काम मिटकॉनने केलेच त्याचबरोबर जनतेच्या तक्र ारी थेट त्यांच्या दारात जावून सोडविण्याकरिता मिटकॉनने गेल्या वर्षभरात चांगली यंत्रणा तयार करून ती कार्यान्वित केली. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यात कॉम्पॅक्टरसह गाड्या सुध्दा वाढविण्यात आल्या. त्याचबरोबर कचरामुक्त रस्ते आणि कचराकुंडी परिसर हे अभियान हाती घेतले आहे. त्याची सुरुवात नवीन पनवेलपासून करण्यात आली आहे. त्यामुळे या नोडचे रस्ते त्याचबरोबर कचरा कुंडीच्या ठिकाणी कचरा दिसून येत नाही. याबद्दल स्थानिक नगरसेविका सीता पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे. अशाच प्रकारे सिडकोने अभियान राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
------
खास फिरते पथक
नवीन पनवेल व खांदा वसाहतीत दररोज ८० टन कचरा निर्माण होते. या नोडमध्ये एकूण ६९ सार्वजनिक कचरा कुंड्या असून दिवसातून एकदा येथील कचरा उचलला जातो. मात्र एकूण ४४ ठिकाणी कचराकुंड्या त्याचबरोबर रस्त्यावर कचरा टाकण्यात येतो. हा कचरा सर्वदूर पसरून स्वच्छतेचा बोजवारा उडतोच त्याचबरोबर दुर्गंधी पसरत होती. आता याकरिता खास फिरते पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्यामधील कामगारांना फावडे, झाडू त्याचबरोबर इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे कामगार रस्त्यावर त्याचबरोबर कचराकुंडीभोवती पडलेला कचरा जमा करून तो कुंडीत टाकतात. त्याचबरोबर आजूबाजूला पावडर मारीत असल्याने दुर्गंधी येत नाहीच त्याचबरोबर डासांची उत्पती होत नसल्याचे मिटकॉनचे पर्यवेक्षक नितीन बागुल यांनी सांगितले.

Web Title: Cidco's Jalakalamboli for cleanliness:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.