गृहबांधणीत सिडकोची उदासीनता, ४९ वर्षांत फक्त १ लाख ८३ हजार घरांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 02:43 AM2018-03-13T02:43:48+5:302018-03-13T02:43:48+5:30

गृहनिर्मिती हा स्थापनेचा मुख्य पाया असलेल्या सिडकोला गृहबांधणीचा विसर पडल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. कारण गेल्या ४९ वर्षांत सिडकोने चार शहरात फक्त १ लाख ८३ हजार घरांची निर्मिती केली आहे.

CIDCO's apathy in housing management, in the last 49 years, the creation of only 1.83 lakh houses | गृहबांधणीत सिडकोची उदासीनता, ४९ वर्षांत फक्त १ लाख ८३ हजार घरांची निर्मिती

गृहबांधणीत सिडकोची उदासीनता, ४९ वर्षांत फक्त १ लाख ८३ हजार घरांची निर्मिती

Next

कमलाकर कांबळे 
नवी मुंबई : गृहनिर्मिती हा स्थापनेचा मुख्य पाया असलेल्या सिडकोला गृहबांधणीचा विसर पडल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. कारण गेल्या ४९ वर्षांत सिडकोने चार शहरात फक्त १ लाख ८३ हजार घरांची निर्मिती केली आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे १९७७ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाने गेल्या ४१ वर्षांत तब्बल ४ लाख ६८ हजार ९४0 घरकुलांचे बांधकाम आणि पुनर्विकास केल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यासाठी १९७0 मध्ये राज्य सरकारने सिडको महामंडळाची स्थापना केली. येत्या १७ मार्च रोजी सिडकोच्या स्थापनेला ४९ वर्षे पूर्ण होत आहेत. नवीन शहर वसविताना विविध घटकांसाठी घरांची निर्मिती करण्याची जबाबदारी सुध्दा सिडकोवर सोपविण्यात आली होती. नवी मुंबईसह औरंगाबाद, नांदेड व नाशिक या शहरात सुध्दा सिडकोने नवीन वसाहती उभारण्याचे काम केले.
विशेष म्हणजे गेल्या चाळीस वर्षात या चार शहरात मिळून सिडकोने फक्त १ लाख ८२ हजार ९४२ इतक्याच घरांची निर्मिती केल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी एकट्या नवी मुंबईत १ लाख २८ हजार ४५४ घरे बांधली आहेत.
नवी मुंबईत सिडकोने आतापर्यंत १३ नोड विकसित केले आहेत, तर पुष्पकनगर हे चौदावे नोड प्रस्तावित आहेत. विकसित झालेल्या नोड्सची लोकसंख्या २0 लाखांच्या घरात आहेत. त्या तुलनेत सिडकोने बांधलेल्या घरांची संख्या नगण्य असल्याचे दिसून आले आहे. सुरुवातीच्या काळात सिडकोने घरबांधणीवर भर दिला, परंतु कालांतराने ही जबाबदारी खासगी विकासकांवर सोपविण्यात आली. त्यासाठी आवश्यक असलेले भूखंड सिडकोने उपलब्ध करून दिले. हे भूखंड निविदा प्रक्रियेद्वारे उपलब्ध केले गेल्याने भूखंडांच्या किमती वाढल्या. पर्यायाने घरांच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी सिडकोने पुन्हा घरबांधणीकडे आपला मोर्चा वळविला.
या काळात विविध गृहप्रकल्पांच्या माध्यमातून सुमारे चौदा हजार घरे बांधण्यात आली, तर आणखी पंधरा हजार घरांचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील काही वर्षात तब्बल पन्नास हजार घरे बांधण्याचे सिडकोचे उद्दिष्ट आहे. असे असले तरी शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्येच्या प्रमाणात सिडकोने बांधलेल्या घरांची संख्या अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे. गृहबांधणीत सिडकोने दाखविलेल्या उदासीनतेमुळे येथील घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
>मध्यंतरीच्या कालावधीत सिडकोने घरबांधणीपेक्षा पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर अधिक भर दिला. त्यामुळे घर निर्मितीचा अपेक्षित पल्ला गाठता आला नाही, परंतु या काळात खासगी विकासकांच्या माध्यमातून आवश्यक घरांची निर्मिती करण्यात आली. सध्या नवी मुंबईची लोकसंख्या २0 लाखांच्या घरात आहेत, परंतु ४0 लाख लोकसंख्येला पूरक ठरणाºया पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
- डॉ. मोहन निनावे,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको
>सिडकोने चार शहरात बांधलेल्या घरांचा तपशील
ंशहर अल्प उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट उच्च उत्पन्न गट एकूण खर्च (कोटी)
नवी मुंबई ६४,४७३ ३५२४५ २८,७३६ १,२८,४५४ २,४४७
औरंगाबाद १९,५0१ २,१२७ ४३२ २२,0६0 ५६
नाशिक २१,३४३ २६१९ ५८२ २४,५४४ ४२
नांदेड ७,७५८ १२६ 0 ७८८४ ९
एकूण १,१३,0७५ ४0,११७ २९,७५0 १,८२,९४२ २,५५४

Web Title: CIDCO's apathy in housing management, in the last 49 years, the creation of only 1.83 lakh houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.