सिडकोत घाऊक बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:28 IST2019-07-10T23:28:43+5:302019-07-10T23:28:46+5:30
१३ अधिकाऱ्यांच्या बदल्या : प्रशासकीय कारणास्तव व्यवस्थापनाचा निर्णय

सिडकोत घाऊक बदल्या
नवी मुंबई : सिडको व्यवस्थापनाने लक्षणीय खांदेपाटल केले आहेत. त्यानुसार विविध विभागात कार्यरत असलेल्या १३ अधिकाऱ्यांच्या विभागीय बदल्या करण्यात आल्या आहेत. पणन-२ विभागाचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत डावरे यांची शहर सेवा (१) चे व्यवस्थापक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर या विभागाच्या विद्यमान व्यवस्थापिका प्रमदा बिडवे यांची पनवेल विभागीय कार्यालयात बदली केली आहे.
सिडकोच्या कामकाजात गतिमानता व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने व्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याचे समजते. विशेष म्हणजे सिडकोतील संभाव्य बदल्यासंदर्भात लोकमतने सविस्तर वृत्त दिले होते. लोकमतचे हे वृत्त खरे ठरले आहे. सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे यांनी मंगळवारी १३ अधिकाºयांच्या बदलीचे आदेश जारी केले. यात डावरे आणि बिडवे यांच्यासह कार्मिक विभागाचे (२) व्यवस्थापक भरत ठाकूर, अनधिकृत बांधकाम नियंत्रक (नैना) एस. आर. राठोड व पणन (१) विभागाचे व्यवस्थापक अमित शिंदे, कार्मिक विभागाच्या व्यवस्थापिका विद्या तांबवे, सामाजिक सेवा अधिकारी प्रशांत भंगारे, शहर सेवा (३) व्यवस्थापक आर. बी. टकले, अतिरिक्त भूख्य भूमी व भूमापन अधिकारी (विमानतळ) पी. बी. साबळे, शहर व्यवस्थापक (१) एम. के. कोळी, अनधिकृत बांधकाम विभागाच्या सहा. नियंत्रक श्वेता वाडेकर व सह पणन अधिकारी अमित राजपूत या वरिष्ठ अधिकाºयांचा समावेश आहे.
भरत ठाकूर यांच्यावर मुख्य प्रशासक (नवीन शहरे) म्हणून जबाबदारी टाकण्यात आली आहे. तर ठाकूर यांच्या रिक्त झालेल्या कार्मिक विभागाच्या व्यवस्थापक पदावर एस.आर. राठोड यांची बदली करण्यात आली आहे. डी. एस. चौरे यांची सिडकोच्या वाशी विभागीय कार्यालयात बदली करण्यात आली आहे. कार्मिक विभागाच्या विद्या तांबवे यांची बदली सिडकोच्या खारघर कार्यालयत करण्यात आली आहे. तर त्यांच्या रिक्त झालेल्या कार्मिक विभागाच्या व्यवस्थापक पदावर समाजसेवा अधिकारी प्रशांत भंगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन अधिकाºयांवर अतिरिक्त कार्यभार
च्उपजिल्हाधिकारी तथा शहर सेवा (३) विभागाचे व्यवस्थापक अशोक मुंडे आणि शहर सेवा (१) विभागाचे व्यवस्थापक फैयाज खान यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यानुसार मुंडे यांच्यावर सिडकोच्या ऐरोली विभागीय कार्यालयाचा तर फैयाज खान यांच्यावर शहर सेवा (३) विभागाच्या सह व्यवस्थापक पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.
च्गेल्या वर्षी सिडकोने काढलेल्या मेगागृह योजनेच्या सोडत प्रक्रियेचे काम पणन (२) विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. सध्या या विभागाचे व्यवस्थापक म्हणून लक्ष्मीकांत डावरे हे काम पाहत आहेत. या पदावरून त्यांची बदली करण्यात आली असली तरी गृहनिर्माण योजनेतील सोडतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते नवीन पदाचा कार्यभार स्वीकारतील, असे या बदली आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.