शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

सिडकोला दिलासा देणारे वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 7:57 AM

मावळते वर्ष सिडकोचे मनोधैर्य वाढविणारे ठरले आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना मिळाली. विशेषत: आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा होणार विरोध मावळला.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : मावळते वर्ष सिडकोचे मनोधैर्य वाढविणारे ठरले आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना मिळाली. विशेषत: आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा होणार विरोध मावळला. प्रमुख कंत्राटदारांची निवड करून प्रकल्पपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली. एकूणच देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबई विमानतळाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करण्यात सिडको प्रशासनाला यश आले.विमानतळाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावतानाच सिडकोचा कारभार लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्यावर व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी भर दिला. त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. नैना क्षेत्राच्या पहिल्या टप्प्यातील पथदर्शी प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी मिळाली. तसेच दुसºया टप्प्याचा विकास आराखडा तयार करून तोही मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. नेरुळ-उरण रेल्वेमार्गाच्या रखडलेल्या कामाला गती मिळाली. सध्या हा मार्ग खारकोपरपर्यंत पूर्ण झाला असून, नवीन वर्षात त्यावर प्रत्यक्ष रेल्वेसेवा सुरू करण्याची तयारी सिडको व रेल्वेने सुरू केली आहे. उर्वरित मार्गाच्या आड येणाºया भूसंपादनाच्या प्रश्नांवरही सिडकोने यशस्वीरीत्या मात केली आहे. हा प्रश्नही निकाली निघाला आहे. त्यामुळे उरणपर्यंतच्या मार्गाचे कामही हाती घेण्यात आले आहे.बेलापूर ते पेंधर हा सिडकोचा आणखी एक ड्रीम प्रोजेक्ट काही कारणांमुळे रखडला होता; परंतु गतवर्षात या कामालाही गती देण्यात आली आहे. मेट्रोच्या चायना मेड आठ कोचची खरेदी करण्यात आली. सध्या त्याची ट्रायल सुरू आहे. हे कामही प्रगतिपथावर आहे. नवीन वर्षात प्रत्यक्ष मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. तसेच नवी मुंबई मेट्रोचा कल्याणपर्यंत विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरत्या वर्षात घेण्यात आला. बजेटमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात सिडकोने गोड बातमी दिली आहे. त्यानुसार नव्या वर्षात तब्बल १५ हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या जिव्हाळ्याचा ठरलेल्या साडेबारा टक्के भूखंड योजनेला गती देण्यात आली. सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांच्या काळात ही योजना काहीशी ठप्प झाली होती. भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दृष्टीने भाटीया यांनी या विभागातील सर्व संचिकांचे स्कॅनिंग करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. त्यामुळे या योजनेला मरगळ चढली होती; परंतु सध्याचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी गतवर्षभरात या योजनेला पुन्हा गती दिली. सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांच्यावर या विभागाची जबाबदारी टाकण्यात आली. इतकेच नव्हे, तर प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करून ही योजना बंद करण्याचा धाडसी निर्णय गगराणी यांनी घेतला. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील साडेबारा टक्के भूखंड योजना बंद करण्यात आली. येत्या काळात रायगड जिल्ह्यातील योजना बंद करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा होणार विरोध मावळला. प्रमुख कंत्राटदारांची निवड करून प्रकल्पपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली.अनधिकृत बांधकाम विभागाची उल्लेखनीय कामगिरीमावळत्या वर्षात सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली. अपुरे मनुष्यबळ, साधन सामग्रीचा अभाव असतानाही वर्षभर अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका चालविला. विशेष म्हणजे, अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडांच्या निविदा काढून त्याची ताबडतोब विक्री करण्याचे अधिकार या विभागाला प्राप्त झाले. या विभागामार्फत नवी मुंबईसह पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली आदी भागातील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तसेच नैना क्षेत्रातही प्रभावी कारवाई मोहीम राबविण्यात आली. एकूणच सरत्या वर्षात बेकायदा बांधकामांना आळा घालण्यात सिडकोला बºयापैकी यश प्राप्त झाले.

टॅग्स :newsबातम्या