शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 19:49 IST

Student Suicide News: पनवेलमधील एका नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात कॉलेजच्या प्राचार्यावर गंभीर आरोप केले गेले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Navi Mumbai Crime news: एका १९ वर्षीय विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरची विद्यार्थीनीनवी मुंबईतील पनवेलमध्ये असलेल्या एका महाविद्यालयात नर्सिंग अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती. तिने महाविद्यालयाचे वसतीगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली. विद्यार्थीनीचा प्राचार्याकडून जातीवरून अपमान करून मानसिक छळ केला जात होता, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कॉलेजच्या प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पनवेलमधील पोयंजे गावात असलेल्या नर्सिंग महाविद्यालयात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थीनी छत्रपती संभाजीनगरची असून, ती अनुसूचित जाती प्रवर्गातून येते. 

पनवेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती खासगी नर्सिंग कॉलेजमधून बीएससी नर्सिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होती. महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती. ३ जून रोजी तिने महाविद्यालयाच्या वेस्टबॅण्ड वसतिगृहातील तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. 

प्राचार्याकडून जातीवरून छळ

दरम्यान, या प्रकरणी विद्यार्थीनीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राचार्याकडून मयत विद्यार्थीनीला जातीवरून हिणवले जात होते. तिला टोमणे मारले जात होते. गेल्या काही महिन्यांपासून तिला वारंवार मानसिक त्रास दिला जात होता, असा आरोप करण्यात आला आहे. हा छळ असह्य झाल्याने तिने आयुष्य संपवले. 

वाचा >>सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला

प्राचार्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी, तसेच अट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात अद्याप कोणतीही अटक झालेली नाही. या प्रकरणाचा आम्ही तपास करत आहोत. साक्षीदार आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सर्व महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस