अ‍ॅडमिशनच्या बहाण्याने फसवणूक

By Admin | Updated: July 8, 2017 06:00 IST2017-07-08T06:00:21+5:302017-07-08T06:00:21+5:30

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे

Cheating by admission of admission | अ‍ॅडमिशनच्या बहाण्याने फसवणूक

अ‍ॅडमिशनच्या बहाण्याने फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पाच साथीदारांना यापूर्वी गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केलेली आहे. या टोळीने १७ जणांची फसवणूक करून तीन कोटी रुपयांचा अपहार केला आहे.
एमबीबीएसकरिता प्रवेश घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आश्वासन देऊन, लाखो रुपये जमा करून, त्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार गतवर्षी सानपाडा येथे घडला होता. याप्रकरणी जानेवारी महिन्यात पाच जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली होती. अभिषेक झा, सौरभ सिंग, गौरव सिंग, सुशीलकुमार वर्मा व हेमंत सरकार अशी त्यांची नावे आहेत. ते सर्व जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यात त्यांच्या इतरही साथीदारांचा सहभाग असल्यामुळे पोलीस त्यांचाही शोध घेत होते. यानुसार इतर दोघांना अटक करण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. ॠ षीकेश सिंग उर्फ मुकेश भगत (३१) व अतिरेक सिन्हा उर्फ राहुल सावन (२९), अशी त्यांची नावे आहेत. दोघेही बंगळुरू येथे बनावट नावाने राहत होते. याची माहिती आर्थिक गुन्हे शाखा कक्ष-एकच्या पथकाला मिळाली होती. यानुसार वरिष्ठ निरीक्षक शिवाजी आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अजित गोंधळी, पोलीस नाईक अजय मोरे, अशोक कंखरे यांचे पथक तयार केले होते. त्यांनी बंगळुरू येथे छापा टाकून दोघांना अटक केली. त्यांनी स्वत:ची बनावट नावाने कागदपत्रेही तयार केली होती. त्यांच्याकडून ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने सानपाडा येथे ‘द एस्पिरेशन’ नावाने कार्यालय सुरू करून नीटची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना फोनवर संपर्क साधून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यापैकी काहींना कार्यालयात बोलावून धनादेश अथवा रोख स्वरूपात १७ जणांकडून एकून तीन कोटी रुपये जमा केले होते. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत त्यांनी कार्यालय बंद करून पळ काढल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला होता.

Web Title: Cheating by admission of admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.