शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

ज्वारीची भाकर ‘गोड’; १० ते २० रुपयांनी स्वस्त; ग्राहकांना दिलासा, शेतकऱ्यांना मात्र बसणार फटका 

By नामदेव मोरे | Published: April 16, 2024 5:44 AM

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन वर्षाच्या सुरुवातीला ज्वारी ३५ ते ७५ रुपये किलो दराने विकली जात होती.

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्यात सर्वच बाजारपेठांमध्ये ज्वारीची आवक वाढू लागली असून दर घसरू लागले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन वर्षाच्या सुरुवातीला ज्वारी ३५ ते ७५ रुपये किलो दराने विकली जात होती. आता हेच दर २५ ते ५६ रुपयांवर आले आहेत. तीन महिन्यात १० ते २० रुपयांची घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 

ज्वारीची भाकरी हे गरिबांचे अन्न समजले जात होते. परंतु, आरोग्यासाठी भाकरी लाभदायक असल्याने मुंबई, नवी मुंबईसारख्या महानगरांमध्येही भाकरीला पसंती मिळू लागली आहे. यामुळे गव्हापेक्षा ज्वारीला जास्त दर मिळत आहे. गतवर्षी उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढले होते. २०२४ च्या सुरुवातीला होलसेल मार्केटमध्ये ज्वारीला  ३५ ते ७५ रुपये किलो एवढा दर मिळाला. किरकोळ मार्केटमध्येही ज्वारी ६५ ते ८५ रुपये किलो दराने विकली जात होती.  

राज्यातील ज्वारीचे दरबाजार समिती    प्रतिकिलो दरसोलापूर    ३३ ते ३५धुळे    २० ते ३८जळगाव    २७ ते ३४सांगली    ३१ ते ३४नागपूर    ३५ ते ३८अमरावती    २५ ते २८पुणे    ३८ ते ५०बीड    १६ ते ३९जालना    २० ते ३५छ.संभाजीनगर    १८ ते ३५अमळनेर    २० ते २३

सोमवारी २२० टन ज्वारीची आवक  फेब्रुवारीपासून ज्वारीचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजार समितीमध्ये २२० टन ज्वारीची आवक झाली आहे. सोलापूर परिसरातून ज्वारी विक्रीसाठी येत आहे. होलसेल मार्केटमध्ये २५ ते ५६ रुपये किलो भाव मिळत आहे. किरकोळ मार्केटमध्येही ज्वारी ४० ते ६० रुपये किलो दराने उपलब्ध होत आहे. ज्वारीचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असली तरी सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई