शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांसाठी स्वस्त उपचार दिवास्वप्नच

By admin | Updated: July 17, 2015 02:49 IST

सुनियोजित शहर म्हणून मिरवणाऱ्या नवी मुंबईत खिशाला परवडणारे औषधोपचार हे दिवास्वप्नच ठरत आहे. शहरातील ६१ रुग्णालयांत तब्बल तीन हजार ९२१ बेड आहेत.

- नामदेव मोरे,  नवी मुंबईसुनियोजित शहर म्हणून मिरवणाऱ्या नवी मुंबईत खिशाला परवडणारे औषधोपचार हे दिवास्वप्नच ठरत आहे. शहरातील ६१ रुग्णालयांत तब्बल तीन हजार ९२१ बेड आहेत. परंतु यानंतरही शहरवासीयांना स्वस्तात उपचार उपलब्ध होत नाहीत. सुपर स्पेशालिटी उपचार सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून त्यासाठी रुग्णांना मुंबईतील रुग्णालयांचाच आधार घ्यावा लागत आहे. सिडकोने शहर वसविताना प्रत्येक नोडमध्ये अत्यावश्यक सुविधांसाठी भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. रुग्णालयांसाठीही प्रत्येक नोडमध्ये भूखंड आहेत. अनेकांना अत्यंत नाममात्र दरात जागा दिली आहे. सद्यस्थितीमध्ये शहरात ६१ रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये ३९२१ बेड उपलब्ध आहेत. अनेक रुग्णालयांत मंजूर बेडपेक्षा जास्त बेड टाकले असून ही संख्या चार हजारपेक्षा जास्त होते. वाशीमध्ये महापालिकेचे ३०० बेड क्षमतेचे प्रथम संदर्भ रुग्णालय आहे. या व्यतिरिक्त तुर्भे, कोपरखैरणे, ऐरोली व नेरूळमध्ये माता-बाल रुग्णालये आहेत. परंतु यामधील नेरूळ व ऐरोलीतील रुग्णालय असून नसल्यासारखे आहे. वाशी रुग्णालयामध्ये सुपर स्पेशालिटी उपचार उपलब्ध होत नाहीत. कॅन्सर, हृदयविकार, बे्रन ट्युमर, मणक्याचे गंभीर आजार व इतर महत्त्वाच्या आजारांवर उपचार होत नाहीत. हिरानंदानी फोर्टीज रुग्णालयामध्ये पालिकेच्या कोट्यातील ३० बेड आहेत. परंतु त्या ठिकाणी अद्याप आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील एकही रुग्णावर उपचार झालेले नाहीत. गरीबांना तिथे जाताच येत नाही. त्यामुळे नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तिथे गेल्यानंतर हजारो रुपये मोजावे लागतात. गंभीर आजारांचे बिल काही लाखांमध्ये जाते. धर्मादाय संस्थांची अनेक मोठी रुग्णालये आहेत. त्यांना नियमाप्रमाणे किमान १५ टक्के रुग्णांवर मोफत उपचार करणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात अपवाद वगळता कोणत्याही रुग्णालयांमध्ये स्वस्तात उपचार होत नाहीत. नवी मुंबईमध्ये रुग्णालयांची संख्या पुरेशी असली तरी सर्वसामान्य नागरिकांना महत्त्वाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी मुंबईतील सायन, जेजे, केईएम व इतर रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. कॅन्सरसाठी टाटा कॅन्सर रुग्णालयाशिवाय समर्थ पर्याय नाही. महापालिका प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पात तरतूद करते, परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच उपाययोजना करत नाहीत.किडनीचे आजारांसाठी डायलेसिस करण्यासाठीही पुरेशी सुविधा नाही. यामुळे बहुतांश रुग्णांना सुपर स्पेशालिटी उपचारांसाठी शहराबाहेर जावे लागते. महापालिकेने नेरूळ व ऐरोलीमध्ये १०० बेडची रुग्णालये उभारली आहेत. परंतु ती वेळेवर सुरू करण्यात अपयश आले आहे. पालिकेच्या अपयशाचा फायदा खासगी रुग्णालयांना होत आहे. लोकप्रतिनिधीही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे सामान्य नागरिकांना उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे.