लोकल गोंधळाचा फटका सीईटी परीक्षार्थींना
By नारायण जाधव | Updated: April 29, 2024 19:35 IST2024-04-29T19:34:35+5:302024-04-29T19:35:01+5:30
लोकल घसरल्याने दिवसभर पनवेल-वाशी ते सीएसएमटी पर्यंतची लोकल वाहतूक विस्कळीत झाली हाेती.

लोकल गोंधळाचा फटका सीईटी परीक्षार्थींना
नारायण जाधव
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर लोकल घसरल्याने दिवसभर पनवेल-वाशी ते सीएसएमटी पर्यंतची लोकल वाहतूक विस्कळीत झाली हाेती. त्याचा सर्वांत मोठा दैनंदिन प्रवाशांसह सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला. सोमवारी सीईटीच्या बी ग्रुपची परीक्षा महामुंबईतील विविध केंद्रांवर होती. परंतु, लोकल गोंधळामुळे परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहोचल्याने त्या शाळा-महाविद्यालयांच्या प्रशासनाने अनेक ठिकाणी सीईटीची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना बसण्यास मज्जाव करून माघारी पाठवले.
लोकल गोंधळामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याने हार्बर मार्गावरील नवी मुंबईसह उरण-पनवेल परिसरातील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. लोकल वेळेत येत नसल्याने अनेकांनी सार्वजनिक बससेवेसह रिक्षा, टॅक्सींचा आधार घेतला.