पावसामुळे मध्य रेल्वे कोलमडली

By Admin | Updated: July 31, 2016 13:43 IST2016-07-31T12:03:58+5:302016-07-31T13:43:07+5:30

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. ठाण्यात प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनच्या ट्रॅकवर पाणी साचले आहे.

Central Railway collapsed due to the rains | पावसामुळे मध्य रेल्वे कोलमडली

पावसामुळे मध्य रेल्वे कोलमडली

ऑनलाइन लोकमत 

ठाणे, दि. ३१ - मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. ठाण्यात प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनच्या ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे ठाणे स्थानकात लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी लोकल आणि रेल्वे स्थानकात अडकून पडले आहेत. 
 
त्यापूर्वी ठाण्याजवळच्या पारसिंग बोगदा इथे ट्रॅकवर पाणी आणि माती आल्याने मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. डोंगरावरची माती ट्रॅकवर आल्यामुळे कल्याण ते सीएसटी जलद मार्ग ठप्प झाला होता. 
 
त्यानंतर जलद मार्गावरची वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली होती. मात्र आता लोकल वाहतूक ठप्प असल्याची माहिती आहे. ठाण्यातील अनेक भागात पाणी साचले आहे. 
 

Web Title: Central Railway collapsed due to the rains