शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयातील सीसीटीव्ही नियंत्रण आयुक्तांकडे

By admin | Updated: March 23, 2017 01:43 IST

महासभा सुरू असताना सभागृहातील घडामोडींचे थेट प्रक्षेपण आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दालनात चालत असल्याचा आरोप

नवी मुंबई : महासभा सुरू असताना सभागृहातील घडामोडींचे थेट प्रक्षेपण आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दालनात चालत असल्याचा आरोप सभागृहनेते जयवंत सुतार यांनी केला. सभागृहात कोण आपल्याविषयी वाईट बोलतेय, हे पाहण्याचे काम आयुक्त करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. यासंदर्भात शहर अभियंता मोहन डगावकर यांनी संपूर्ण मुख्यालयातील सीसीटीव्हीचा कंट्रोलरूम आयुक्तांच्यात दालनात असल्याचे सांगताच, नगरसेवकांचा पारा अधिकच चढला.मंगळवारी सुरू असलेल्या महासभेदरम्यान आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहात उपस्थित नव्हते; परंतु दालनात बसून ते सभागृहातील थेट प्रक्षेपण पाहत असल्याचा आरोप सभागृहनेते जयवंत सुतार यांनी केला. हा आरोप गंभीर असल्याचे सांगत महापौर सुधाकर सोनवणे यांनी शहर अभियंत्यांकडे यासंबंधीची चौकशी केली. या वेळी मोहन डगावकर यांनी मुख्यालयातील सर्वच सीसीटीव्हीचे कंट्रोलरूम आयुक्तांच्या दालनात असल्याचे सांगितले. यावरून सभागृहात उपस्थित नगरसेवकांचा पारा अधिकच चढला. जे नगरसेवक आयुक्तांविरोधात सभागृहात वक्तव्य करतात, त्यांनाच कारवाईच्या माध्यमातून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा नगरसेवक नामदेव भगत यांनी केलेला आहे. त्यामुळे सुतार यांनी सभागृहापुढे उघड केलेल्या प्रकाराचे गांभीर्य इतरही नगरसेवकांनी व्यक्त केले; परंतु महासभेचे थेट प्रक्षेपण महापौर दालनात आठ महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आले असताना, फक्त आयुक्तांच्या दालनात ते कसे सुरू? असा प्रश्न महापौर सुधाकर सोनवणे यांनी उपस्थित केला. तसेच दुसऱ्यांच्या दालनात काय चालले आहे, हे डोकावून पाहण्याची सवय आयुक्तांना जडली असल्याचाही टोला त्यांनी मारला. याचा वापर फक्त इतरांना अडचणीत आणण्यासाठीच केला जात असल्याचे सांगत, मागील काही महिन्यांपासून महापालिकेत पोरखेळ सुरू असल्याचीही टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)