VIDEO: कार चालकानं वाहतूक हवालदाराच्या अंगावर घातली कार, बोनटवरुन फरफटत नेलं; नवी मुंबईतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 15:18 IST2022-07-09T15:16:54+5:302022-07-09T15:18:00+5:30
खारघर येथील वाहतूक शाखेच्या हद्दीत एका कारचालकानं कोपरा ब्रीज येथे वाहतूक पोलिसांना कारच्या बोनटवरुन फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे.

VIDEO: कार चालकानं वाहतूक हवालदाराच्या अंगावर घातली कार, बोनटवरुन फरफटत नेलं; नवी मुंबईतील प्रकार
खारघर येथील वाहतूक शाखेच्या हद्दीत एका कारचालकानं कोपरा ब्रीज येथे वाहतूक पोलिसांना कारच्या बोनटवरुन फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. कोपरा ब्रिज येथे विशेष कारवाई दरम्यान रस्त्याच्या विरुद्ध दिशेनं येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस हवालदार गादेकर यांना नियुक्त करण्यात आलं होतं. यावेळी कोपरा सेक्टर १० कडून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या एकार ह्युंदाई कंपनीच्या कारला गादेकर यांनी अडवलं असताना कार चालकानं कार न थांबवता थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार घातली. कार चालक इथवरच थांबला नाही. तर त्यानं वाहतूक पोलिसाला बोनटवरुन काही मीटर अंतरापर्यंत फरफटत नेलं.
बेदरकार चालकानं कार न थांबवता डिमार्टकडे जाणाऱ्या कोपरा ब्रीज ते स्वर्णा गंगा ज्वेलरी शॉप खारघर या ठिकाणापर्यंत गाडीच्या बोनेटवर टांगून वाहतूक पोलीस हवालदाराला फरफटत नेलं. कोपरा ब्रीज येथे बाजूला कारवाई करत असलेले पोलीस नाईक निवृती भोईर यांनी धाव घेत या गाडीचा पाठलाग केला. यात एका इनोव्हा कार चालकाची मदत घेऊन अगदी फिल्मी स्टाइलनं बेदरकार कार चालकाचा पाठलाग करण्यात आला.
VIDEO: नवी मुंबईत बेदरकार कार चालकानं वाहतूक हवालदाराला बोनटवरुन फरफटत नेलं, घटना कॅमेरात कैद pic.twitter.com/On90gxYo5r
— Lokmat (@lokmat) July 9, 2022
इनोव्हा कार बेदरकार कार चालकासमोर आडवी टाकून आरोपीला रोखण्यात आलं. आरोपीला पकडून देण्यात मदत करणाऱ्या कारमधील डॉ. जानवी पाटील लाइफ लाईन हॉस्पिटल पनवेल यांनी घडलेल्या सर्व प्रकारची मोबाईल वरून शूटिंग केली व पुढील कारवाईसाठी खारघर पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले.