चौथ्या माळ्यावरून कार डक्टमध्ये कोसळली, चालक जखमी; वाशीमधील धक्कादायक घटना
By नारायण जाधव | Updated: October 30, 2023 22:14 IST2023-10-30T22:14:10+5:302023-10-30T22:14:58+5:30
या अपघातामुळे इमारतीतील इतर कार्यालयात कारने येणाऱ्या वाहनचालकांत भितीचे वातावरण पसरले आहे.

चौथ्या माळ्यावरून कार डक्टमध्ये कोसळली, चालक जखमी; वाशीमधील धक्कादायक घटना
नवी मुंबई : वाशीतील रियल टेक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील कार पार्किंगमधून एक कार पहिल्या मजल्यावरील डक्टमध्ये कोसळली. कार लिफ्टमध्ये बिघाड होऊन हा अपघात घडला. कारमध्ये चालक अडकलेला होता.
दुर्घटनेची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दलाने घटनासाठी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अग्निशमन जवानांनी डक्टमध्ये उतरून चालकाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले आहे. जखमी चालकावर उपचार सुरू आहेत. तर कार लिफ्टमध्यो बिघाड नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. या अपघातामुळे इमारतीतील इतर कार्यालयात कारने येणाऱ्या वाहनचालकांत भितीचे वातावरण पसरले आहे.