उरण रोडवर कारची दुचाकीसह ट्रेलरला धडक

By नामदेव मोरे | Updated: November 24, 2023 15:58 IST2023-11-24T15:56:42+5:302023-11-24T15:58:44+5:30

ट्रेलर चालक ठार, तीन जखमी : कारचालकाविरोधात गुन्हा दाखल.

car collided with a trailer on uran road | उरण रोडवर कारची दुचाकीसह ट्रेलरला धडक

उरण रोडवर कारची दुचाकीसह ट्रेलरला धडक

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : बेलापूर उरण रोडवर उलवे येथे कारने दुचाकीसह ट्रेलरला धडक दिली. अपघातामध्ये एकजण ठार झाला असून तीन जखमी झाले आहेत.या प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उरणकडून बेलापूरकडे येणाऱ्या रोडवर गुरूवारी रात्री ९ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला.           

बेलापूर कोळीवाडा येथे राहणारे रोहन मुकादम व सर्वेश मुकादम हे भाऊ स्कूटीवरू जात असताना वेगाने आलेल्या क्रेटा कारने एमएच ४३ बीई ५८७२ स्कूटीला जोरदार धडक दिली. अपघातामध्ये दोघाही भावांना गंभीर दुखापत झाली आहे. स्कूटीच्या पुढे कंटेनरजवळ उभ्या असलेल्या प्रमोद सिंग यालाही कारने धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर दुखापत झाल्याने सिंग याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. कारने रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रेलरलाही धडक दिली. यामुळे कार चालक सिद्धार्थ डेरे हाही गंभीर जखमी झाला आहे.

अतीवेगाने कार चालविल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे. अपघाताचे वृत्त समजताच एनआरआय पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद तोरडमल, पोलिस निरीक्षक संजय चव्हाय, उपनिरीक्षक निवास शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातामुळे या मार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून जखमींना रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी कार चालकाच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: car collided with a trailer on uran road

टॅग्स :Accidentअपघात