शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 06:38 IST

सिग्नल तोडल्याने दुर्घटना 

नवी मुंबई : सिग्नल तोडून रस्ता ओलांडणाऱ्या रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा अपघात झाल्याची घटना पामबीच मार्गावर घडली. यामध्ये कार चालकाचा मृत्यू झाला असून इतर पाचजण जखमी झाले आहेत. अपघातावेळी कार प्रचंड वेगात असल्याने त्यावर नियंत्रण न मिळवता आल्याने कार पाच ते सातवेळा उलटून विरुद्ध दिशेच्या मार्गावर आदळली.पामबीच मार्गावर अक्षर चौकात रविवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. वाशीकडून सीबीडीकडे जाणारी भरधाव कार अक्षर चौकात सिग्नल ओलांडत होती. त्यावेळी सिग्नल लागलेला असतानाही सिग्नल तोडून एक रिक्षा रस्ता ओलांडत होती. अचानक समोर आलेल्या रिक्षाला धडक टाळण्यासाठी कार चालकाने कार वळवली. मात्र कार अधिक वेगात असल्याने कारवर नियंत्रण मिळवता न आल्याने कारची रिक्षाला धडक बसली. त्यानंतर कार पाच ते सात वेळा उलटून घेऊन दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या लेनवर जाऊन आदळली. यावेळी कारमध्ये चालकासह चार व्यक्ती होत्या असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यापैकी दोघेजण कार उलटत असतानाच कारमधून पडून जखमी झाले. अपघातामध्ये कार चालकाचा कारमध्येच चेंगरून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या दुर्घटनेमुळे पामबीच मार्गावरील बेशिस्त वाहतूक पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. तर अक्षर चौकात सातत्याने अपघात होत असल्याने त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते समीर बागवान यांनी केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई