मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कारचा अपघात; पादचारी महिला जखमी
By वैभव गायकर | Updated: November 15, 2023 15:18 IST2023-11-15T15:17:54+5:302023-11-15T15:18:11+5:30
सदर अपघातामध्ये महिला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचाराकरिता एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले आहे.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कारचा अपघात; पादचारी महिला जखमी
पनवेल: मुबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खांदेश्वर पोलीस ठाणेहद्दीत एका कारचा दि.15 रोजी अपघात झाला असून या अपघातात पादचारी महिला महिला जखमी झाली आहे.मारुती सेलेरिओ एमएच.01, डीबी 2382 या क्रमांकाच्या गाडीवर दिलीप उदय राणी (44) हे वाहन चालक होते.
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून मुंबई बाजूकडे जात असताना किमी 2/700 याठिकाणाहून जाणाऱ्या अर्चना महादेव माने (40) या महिला रस्ता ओलांडत क्रॉस असताना कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटून अर्चना महादेव माने यांना ठोकर लागून गंभीर दुखापत अपघात झाली. सदर अपघातामध्ये महिला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचाराकरिता एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.