कोलकातामधील कॉलसेंटरचा भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:09 AM2019-10-05T03:09:31+5:302019-10-05T03:09:46+5:30

जुईनगर येथील बनावट कॉलसेंटरवर केलेल्या कारवाईत कोलकातामध्येही कॉलसेंटर चालत असल्याचे समोर आले होते.

CallCenter Dispersion in Kolkata | कोलकातामधील कॉलसेंटरचा भांडाफोड

कोलकातामधील कॉलसेंटरचा भांडाफोड

Next

नवी मुंबई : जुईनगर येथील बनावट कॉलसेंटरवर केलेल्या कारवाईत कोलकातामध्येही कॉलसेंटर चालत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार गुन्हे शाखा पोलिसांनी ही बाब कोलकाता पोलिसांच्या निदर्शनास आणून देऊन कारवाई केली. दरम्यान, जुईनगर येथील कॉलसेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांची सुमारे सात हजार डॉलरची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेतील नागरिकांना कॉलिंगद्वारे धमकावून पैसे उकळणारे कॉलसेंटर जुईनगर येथे चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. गतमहिन्यात गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, सहायक निरीक्षक नीलेश तांबे, राजेश गज्जल, राणी काळे, सहायक उपनिरीक्षक संजय पवार आदीच्या पथकाने छापा टाकला होता. या वेळी कॉन्सीअर्ज हेल्प केअर सोल्युशन नावाने हे कॉलसेंटर चालवणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी प्रमुख सूत्रधार मोहम्मद साजीद मोहम्मद जुनेद शेख (२९) याच्यासह त्याचा एक साथीदार व इतर एक जण पूर्वी कोलकाता येथील कॉलसेंटरमध्ये काम करत होते. पथकाने कॉलसेंटरचा शोध घेत स्थानिक पोलिसांमार्फत कारवाई केली.

जुईनगरमधील कारवाईत अमेरिकन नागरिकांना धमकावून सुमारे सात हजार डॉलर एका खात्यात ट्रान्सफर करून घेतले असल्याचे उघड झाल्याचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले. आरोपींनी ज्या कंपनीच्या नावे कॉलसेंटर सुरू केले होते, त्याच नावाची अमेरिकेतही कंपनी आहे. यामुळे इंटरनेट गेटवे वापरून डेटा चोरला होता. त्याआधारे संगणक दुरुस्तीच्या बहाण्याने नागरिकांना धमकावले जात होते.

Web Title: CallCenter Dispersion in Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.