फसवणुकीप्रकरणी बिल्डरला अटक

By Admin | Updated: June 26, 2016 00:29 IST2016-06-26T00:29:53+5:302016-06-26T00:29:53+5:30

पनवेल तालुक्यातील हरिग्राम येथे बांधकामाची साईट सुरु करतो व दोन वर्षात फ्लॅटचा ताबा देतो, असे सांगून गणेश सोपान घाडगे या बांधकाम व्यावसायिकाने 7 लाख 93 हजार रु पयांची

Builder arrested for fraud | फसवणुकीप्रकरणी बिल्डरला अटक

फसवणुकीप्रकरणी बिल्डरला अटक

पनवेल : पनवेल तालुक्यातील हरिग्राम येथे बांधकामाची साईट सुरु करतो व दोन वर्षात फ्लॅटचा ताबा देतो, असे सांगून गणेश सोपान घाडगे या बांधकाम व्यावसायिकाने 7 लाख 93 हजार रु पयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन घाडगे यास अटक करण्यात आली आहे.
नविन पनवेल येथील बांधकाम व्यावसायिक गणेश घाडगे याने हरिग्राम येथे विघ्नहर्ता पॅराडाईस नावाने इमारतीचे बांधकाम सुरु असून दोन वर्षात फ्लॅटचा ताबा देतो असे सीवुड येथील सुरेखा राजू दिवटे यांना सांगितले होते. त्यामुळे दिवटे यांनी सुमारे १७ लाखांना सदनिका बुक केली. त्याबदल्यात दिवटे यांनी बिल्डरला सुमारे ८ लाख ९३ हजार दिले. परंतू बिल्डरने फ्लॅट न दिल्याने दिवटे यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती.

Web Title: Builder arrested for fraud