शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 11:29 PM

नवी मुंबई : पेट्रोल - डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ...

नवी मुंबई : पेट्रोल - डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना गुरुवार, २५ फेब्रुवारीपासून विना अनुदानित एका सिलिंडरसाठी ७९४ रुपये मोजावे लागणार असल्याने गृहिणींमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. 

नवी मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत आता ७६९ रुपयांवरून ७९४ रुपयांवर पोहोचली आहे. डिसेंबर २०२० मध्ये घरगुती सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची वाढ करण्यात आली होती. राष्ट्रीय तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, बीपीसीएल, एचपीसीएल या कंपन्यांनी दोनदा प्रत्येकी ५० रुपयांची वाढ केली होती. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दणका बसला आहे.

 नवी मुंबईत बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपखैरणे, घणसोली आणि ऐरोली परिसरात गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या १५ ते २० एजन्सीज् आहेत.  अनेक ठिकाणी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महानगर गॅस कंपनीमार्फत पाइपलाइनद्वारे घरगुती गॅसपुरवठा केला जात असल्यामुळे सिलिंडरची संख्या कमी झाल्याची या दरवाढीचा फटका विनाअनुदानित गॅस सिलिंडर घेणाऱ्यांना बसत आहे. तसेच अनुदानित गॅस सिलिंडरधारकांना मिळणारी सबसिडीसुद्धा कमी मिळत असल्याचे चित्र आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणारे लग्नसराईचे दिवस पाहता दरवाढ अधिक चिंताजनक ठरणार आहे, असे घणसोली येथील गृहिणी चांदणी म्हात्रे यांनी सांगितले.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCylinderगॅस सिलेंडर