बहीण व आईला मारहाण केल्यामुळे मेहुण्याने केली भावजीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 03:08 IST2017-10-11T03:08:18+5:302017-10-11T03:08:32+5:30

बहीण व आईला मारहाण केल्यामुळे मेहुण्याने भावजीची हत्या केल्याचा प्रकार ऐरोली येथे घडला आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी मेहुण्याला ताब्यात घेतले आहे.

 Brother-in-law murdered brother and sister | बहीण व आईला मारहाण केल्यामुळे मेहुण्याने केली भावजीची हत्या

बहीण व आईला मारहाण केल्यामुळे मेहुण्याने केली भावजीची हत्या

नवी मुंबई : बहीण व आईला मारहाण केल्यामुळे मेहुण्याने भावजीची हत्या केल्याचा प्रकार ऐरोली येथे घडला आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी मेहुण्याला ताब्यात घेतले आहे. त्याने साथीदारांच्या मदतीने भावजीचा पाठलाग करून संधी मिळताच, धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती.
अरुण काटकर असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते ऐरोलीत रिक्षाचालक होते. सोमवारी रात्री मित्रासोबत ते स्वत:च्या रिक्षाने चालले होते. या वेळी भूषण हॉटेललगत एकांताच्या ठिकाणी मित्राला लघुशंकेसाठी त्यांनी रिक्षा थांबवली होती. या वेळी त्यांचा पाठलाग करत आलेल्या व्यक्तींनीकाटकर यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले.
याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी राहुल पवार याला चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे. तो काटकर यांचा मेहुणा असून त्यानेच हत्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली
आहे.

Web Title:  Brother-in-law murdered brother and sister