शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

बाजार समितीमध्ये बाजरीची तिप्पट आवक; घरासह हॉटेलमध्येही बाजरीच्या वस्तूंना मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:00 IST

हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईमधील धान्य मार्केटमध्ये बाजरीची आवक तिप्पट झाली आहे. एक महिन्यापूर्वी रोज २० ते ३० टन आवक होत होती, ती ८० ते १०० टन एवढी झाली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईमधील धान्य मार्केटमध्ये बाजरीची आवक तिप्पट झाली आहे. एक महिन्यापूर्वी रोज २० ते ३० टन आवक होत होती, ती ८० ते १०० टन एवढी झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांसह गुजरात व उत्तर प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात आवक होत असून, १८ ते २६ रुपये किलो दराने विक्री होत आहे.मुंबई, नवी मुंबईकरांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढू लागली असून प्रत्येक मोसमामध्ये आहारात बदल होऊ लागले आहेत. थंडी सुरू झाल्यापासून उष्णतावर्धक वस्तूंची मागणी वाढली आहे. यामध्ये सर्वांत जास्त मागणी बाजरीला आहे. बलवर्धक धान्य म्हणून याची ओळख आहे. कफनाशक, उष्णतावर्धक बाजरीमध्ये तंतुमय पदार्थ, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक व व्हिटॅमिन ई आढळून येते. यामुळेच प्रत्येक वर्षी हिवाळ्यामध्ये ग्राहकांकडून याला पसंती मिळत असते. एक महिन्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये १७०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत होती. थंडी सुरू झाल्यापासून आवक तिप्पट झाली असून, बाजारभावही क्विंटलला १०० रुपयांनी वाढले आहेत.सद्य:स्थितीत १८०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर व इतर ठिकाणांवरून बाजरी विक्रीला येत आहे. उत्तर प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात आवक होत असून, काही प्रमाणात गुजरातवरून आवक होत आहे. हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईकरांच्या घरांमध्ये व हॉटेलमध्येही बाजरीची भाकरी, थालीपीठ, बाजरीची वडी व इतर पदार्थांना पसंती मिळत आहे. मुंबईत चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी व परराज्यातील व्यापारी मुंबईत बाजरी विक्रीसाठी पाठवू लागले आहेत.बाजरीचे जगातील सर्वाधिक ४२ टक्के उत्पादन भारतामध्ये होत असते. राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाना, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांत मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते. राज्यातील नाशिक, जालना व इतर जिल्ह्यांमध्ये बाजरीची लागवड केली जाते.राज्यात सर्वाधिक विक्री मुंबईत होत आहे. मकरसंक्रांतीपर्यंत आवक चांगली राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पुढील कारणांमुळे बाजरीला मागणीबाजरी उष्णतावर्धक असल्यामुळे हिवाळ्यामध्ये ऊर्जास्रोत ठरत आहे. बाजरीच्या पदार्थांमुळे खूप वेळेपर्यंत भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठीही बाजरीचा उपयोग होतो.कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजरीचा उपयोग होतो. यामुळे हृदय सक्षम होण्यास मदत होते. यामध्ये मेग्नॅशियम व पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.बाजरीमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते. नियमित बाजरीचे पदार्थ खाल्ल्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदतहोते.कफनाशक, उष्णतावर्धक बाजरीमध्ये तंतुमय पदार्थ, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक व व्हिटॅमिन ई आढळून येते.बाजरीचे पदार्थथालीपीठ, भाकरी, सूप, कटलेट्स,बाजरी खिचडी, मेथी वडी, खारवडेबाजरीची आवक व बाजारभावमार्केट आवक (क्विंटल) भाव (किलो)मुंबई ८०७ १८ ते २६जालना १०६ १५ ते २२बारामती २५९ १५ ते २२उल्हासनगर ११५ २० ते २२राज्यनिहाय बाजरीचे उत्पादन (२०१६)राज्य उत्पादन टक्केराजस्थान ३५३० ४३.६९उत्तर प्रदेश १७८० २२.३गुजरात ७९० ९.७८हरियाना ६५० ८.४मध्य प्रदेश ५९० ७.३०महाराष्ट्र ३४० ४.२१

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई