शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

नागरी आरोग्य केंद्र ठरतेय वरदान, कोरोना नियंत्रणात महत्त्वाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 23:29 IST

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ब्रेक द चेन मोहीम सुरू केली आहे. मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोना नियंत्रण अभियानामध्ये नागरी आरोग्य केंद्रांची भूमिका महत्त्वाची ठरू लागली आहे. आरोग्य यंत्रणेचा कणा म्हणून २३ आरोग्य केंद्रांची ओळख निर्माण झाली आहे. रुग्ण तपासणीसह रुग्णालयात भरती करण्यापर्यंत व माहिती संकलनासह जनजागृतीपर्यंतची बहुतांश सर्व कामे या केंद्रांच्या माध्यमातूनच सुरू आहेत.नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ब्रेक द चेन मोहीम सुरू केली आहे. मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये नागरी आरोग्य केंद्र महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हे स्पष्ट झाल्यामुळेच आयुक्तांनी या केंद्रांशी समन्वय वाढविला आहे. प्रतिदिन न चुकता २३ नागरी आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला जात आहे. परिसरातील रुग्णांची संख्या, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या, नवीन रुग्ण, मृत्युदर, महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना या सर्वगोष्टींचा आढावा घेत आहेत. सद्यस्थितीमध्ये शहरातील मृत्युदर कमी झाला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. या यशामध्येही आरोग्य केंद्रांचा सिंहाचा वाटा आहे.आरोग्य केंद्रामध्ये नियमित फ्लू ओपीडी सुरू आहे. कोरोनाव्यतिरिक्त आजारांवरही उपचार सुरू आहेत. प्रतिदिन सकाळी आरोग्य केंद्रामध्ये शहरातील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची यादी येत असते. ती यादी तपासून कार्यक्षेत्रामधील रुग्णांची यादी तयार करणे, रुग्णांशी संपर्क साधून त्यांना रुग्णालयात भरती करणे, रुग्णाच्या संपर्कामधील व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्याचे कामही आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुरू असते.महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे. परिसरातील खासगी रुग्णालयांशीही समन्वय साधण्याचे कामही आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे.या सर्व प्रक्रियेमध्ये आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाºयास प्रतिदिन किमान १०० ते २०० नागरिकांशी संपर्क साधावा लागत आहे.रुग्ण व त्याचे नातेवाईक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते या सर्वांशी सुसंवाद ठेवून काम करावे लागत आहे. नागरिकांकडून हि क ौतुक होत आहे.कर्मचाऱ्यांचे दिवस रात्र कामआरोग्य केंद्रातील डॉक्टर ते आरोग्यसेविका, लिंक वर्करपर्यंतचे सर्वच कर्मचारी दिवसरात्र परिश्रत करत असल्यामुळे, शहरातील कोरोनामुक्त होणाºया रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. खºया अर्थाने कोरोना योद्ध्याप्रमाणे येथील कर्मचारी काम करत असून, नागरिकांकडूनही त्यांचे कौतुक होऊ लागले आहे.नागरी आरोग्य केंद्रामुळे नागरिकांना कोरोनाच्या काळात मोठा दिलासा मिळत आहे. कारण रुग्ण पॉझिटिव्ह झाल्यानंतर काय करावे? कुठे जावे? कोणत्या रु ग्णालयात दाखल करावे असे सारे प्रश्न या आरोग्य केंद्रामुळे सुटले आहेत.रु ग्णांच्या नातेवाईकांच्या अनेक शंकांचे निरसण या ठिकाणी होत आहे.नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारीअर्चना तायडे, प्रवीण कटके, कविता बोर्डे, रत्नेश म्हात्रे, संजय आठवले, अशोक जाधव, पुष्पा जवादे, महेश चव्हाण, कैलास गायकवाड, मनेका पाटील, विद्या वर्मा, मैथिली शिंदे, वंदना नारायणे, उज्ज्वला बारापात्रे, दर्शना वाघमारे, वर्षा तळेगावकर, सचिन चिटणीस, भावना बनसोडे, सुषमा सारूक्ते, मिलिंद वसावे, सुरेश कुंभारे, वैशाली म्हात्रे, अपर्णा मालवणकर.

आरोग्य केंद्राच्या माध्यमातून होणारी कामे- प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात फ्लू ओपीडी सुरू.- सकाळी सात वाजता शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या यादीतून कार्यक्षेत्रातील रुग्णांच्या नावांची छाननी.- पॉझिटिव्ह रुग्णांशी संपर्क साधून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करणे.- रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील किमान २० नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे.- जवळच्या संपर्कातील व्यक्तीची आरोग्य तपासणी करणे.- रुग्णाचा पत्ता चुकीचा असेल किंवा चुकीचा नंबर असेल, तर त्याविषयी पुढील उपाययोजनांसाठी वरिष्ठांना माहिती देणे.- कोरोनाविषयी परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करणे, नागरिकांशी संवाद साधणे.- प्रत्येक घरोघरी जाऊन होणाऱ्या सर्वेक्षणावर लक्ष ठेवणे.- कंटेन्मेंट झोन व कोरोना प्रतिबंधासाठीच्या नियमांचे परिसरात अंमलबजावणी करणे.- कोरोनाव्यतिरिक्त लसीकरण व इतर आरोग्यविषयी उपाययोजना करणे.आरोग्य केंद्रनिहाय शिल्लक रुग्णव कोरोनामुक्त झालेल्यांचा तपशीलआरोग्य केंद्र अ‍ॅक्टिव्ह केसेस कोरोनामुक्तऐरोली १६७ १,५९५सीबीडी २२१ १,५३६चिंचपाडा २० २५९दिघा ६३ ७३९घणसोली २९६ २,५५०इलठाणपाडा ९ ३७०इंदिरानगर १० १४९जुहूगाव ३१९ १,५६३करावे २१६ १,१३७कातकरीपाडा २० २२५खैरणे २२५ २,४६६कुकशेत १७३ १,३६७महापे १९३ १,५१४नेरुळ १ १३३ १,०५३नेरुळ २ ७९ ९७५नोसील नाका ५५ ७५५पावणे १५५ ८५४रबाळे २३८ १,७८३सानपाडा २६९ १,५६०से. ४८ सीवूड १८६ ८१५शिरवणे १५२ १,४६९तुर्भे १०६ ७६१वाशीगाव २१२ ९९०

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई