शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने कोट्यवधींचा गंडा, चौघांना अटक : १०० हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 07:14 IST

सीबीडी सेक्टर १५ येथे वनिता इंटरप्रायजेस नावाच्या कंपनीने नागरिकांकडून गुंतवणूक करून घेऊन फसवणूक केल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे प्राप्त झाली होती.

नवी मुंबई : गुंतवलेल्या रकमेचे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने १०० हून अधिक गुंतवणूकदारांची २ कोटीहून अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सीबीडी सेक्टर १५ येथे वनिता इंटरप्रायजेस नावाच्या कंपनीने नागरिकांकडून गुंतवणूक करून घेऊन फसवणूक केल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी आर्थिक शाखा कक्ष १चे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चांदेकर यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये वनिता इंटरप्रायजेस कंपनीकडून त्रिशूल गोल्ड नावाने स्कीम चालवली जात असल्याचे उघड झाले. त्यांनी २०१७ पासून नागरिकांकडून गुंतवणूक करून घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार गुन्हे शाखा पोलिसांनी कंपनीचे प्रमुख वनिता पाटील व अभिजीत पाटील यांच्यासह मॅनेजर मुकुंद पुराणिकयांना सोमवारी रात्री अटक केली आहे. 

कंपनीने नफा देणे केले होते बंद  सुरुवातीच्या काही व्यक्तींना २० महिन्यात गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम दिली होती. गुंतवलेल्या रकमेच्या दहा टक्के परतावा दर महिना देऊन २० महिन्यात दुप्पट रक्कम परत केली जाणार होती. त्यामुळे कंपनीवर विश्वास बसल्यानंतर गुंतवणूकदार वाढले असता मार्च २०२० पासून कंपनीने नफा देणे बंद केले होते. तेव्हापासून गुंतवणूकदार कार्यालयात फेऱ्या मारत होते. 

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटकMONEYपैसा