शिवशाहीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 5, 2023 15:41 IST2023-04-05T15:40:31+5:302023-04-05T15:41:30+5:30
शिवशाही बसच्या धडकेत मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना ठाणे बेलापूर मार्गावर घडली.

शिवशाहीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: शिवशाही बसच्या धडकेत मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना ठाणे बेलापूर मार्गावर घडली. याप्रकरणी बस चालकावर रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी रात्री ठाणे बेलापूर मार्गावर रिलायबल कंपनी पासून काही अंतरावर हा अपघात घडला. त्याठिकाणी अपघात झाल्याची माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी पोलिसांचे पथक त्याठिकाणी गेले होते. यावेळी बसच्या मागील चाकाखाली अडकलेल्या एकाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. वसंत शेट्टी असे दुचाकीस्वाराने नाव असून त्यांच्या मोटरसायकलला शिवशाही बसची धडक लागल्याने ते दुचाकीसह बसच्या खाली गेले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी बस चालक रमेश लाव्हारे विरोधात रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"