शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडी, विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:52 IST

शाळांमध्ये भाषा संवर्धनासाठी शपथ; स्वयंसेवी संस्था, सरकारी कार्यालये, राजकीय पक्षांकडूनही आयोजन

नवी मुंबई : मराठी राजभाषा दिन शहरात उत्साहात पार पडला. यानिमित्ताने शहरातील शाळा, स्वयंसेवी संस्था तसेच राजकीय पक्षांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आणि उपक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. नेरुळमध्ये शाळेच्या माध्यमातून ग्रंथ दिंडीचे आयोजन केले होते.ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मराठी राजभाषा दिन साजरा केली जातो. या दिनाचे औचित्य साधून विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. नेरु ळ शिरवणे येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १५ व शाळा क्र मांक १०१ येथे संपन्न झालेल्या या कार्यक्र मात विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनाची व दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर करण्याची शपथ घेतली. या वेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व मावळ्यांच्या वेशभूषा केल्या होत्या. कार्यक्र माचे आयोजन मुख्याध्यापिका तन्वी सुर्वे व मंगल भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या वेळी शिक्षिका रंजना साळी यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा प्रवास व सौंदर्यस्थळे उलगडून दाखविली तर वर्तना बांगर यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होणे गरजेचे असल्याचे सांगितले. कलाशिक्षक अमृत पाटील नेरु ळकर यांनी सादर केलेल्या, ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’ या गीताने कार्यक्र माची सांगता झाली. नेरुळमधील विद्याभवन संकुलाच्या सभागृहामध्ये मराठी राजभाषा दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला. विद्यार्थी व शिक्षक यांनी आपल्या भाषणातून मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व व इतिहास पटवून दिला. शाळेच्या माध्यमातून ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चकोर शहा, संचालक दिनेश मिसाळ माध्यमिक इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीजा नायर, प्राथमिक इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा मुळीक आदी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेरुळ येथील एन. आर. भगत इंग्लिश स्कूल, एन. आर. भगत ज्युनिअर व सिनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरवदिन साजरा करण्यात आला. कार्यक्र माची सुरु वात संस्थेचे संस्थापक नामदेव भगत व मोहन तेली यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्र माच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी भाषण, विविध मराठी गीते गायली, छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाड्यांचे गायन, वेशभूषा आदी कार्यक्र मांचे सादरीकरण केले. याप्रसंगी मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कोठेकर, वंदना पाटील, कॉलेजचे प्राचार्य सुमित भट्टाचार्य, संस्थेचे खजिनदार अशोक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. वाशीतील अंजुमन इस्लाम स्कूलमधील विद्यार्थ्यांनीही मराठी राजभाषा दिन साजरा केला. मराठी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी फलकावर मराठी अक्षरे गिरवली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास सांगत मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. नेरुळमधील शिवसमर्थ सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून सेक्टर १६ ए येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे मैदानात मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. कुसुमाग्रज यांच्या काही कविता रांगोळीतून साकारण्यात आल्या.