शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

‘नैना’त घरे घेताना सावधान!

By admin | Updated: July 23, 2015 03:51 IST

सिडकोच्या नैना क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. कोणतीही परवानगी न घेता सर्रास टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत

नवी मुंबई : सिडकोच्या नैना क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. कोणतीही परवानगी न घेता सर्रास टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. या बेकायदा इमारतीतील घरे गरजूंच्या माथी मारून त्यांची फसवणूक केली जात आहे. याविरोधात आता सिडकोनेच कंबर कसली असून नैना क्षेत्रात घरे किंवा कोणतीही मालमत्ता विकत घेताना नागरिकांनी त्याची वैधता तपासून पाहावी, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्ल्युअन्स नोटीफाइड एरिया (नैना) अर्थात नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रात सिडकोच्या माध्यमातून एक नवे शहर लवकरच आकारास येऊ घातले आहे. सुमारे ५६१.७२ चौरस किलोमीटर क्षेत्रात ‘नैना’ प्रकल्प आकारास येणार आहे. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या सुमारे २५ किमी चौरस परिघातील २७० गावांच्या क्षेत्रातील जमीन शासनाने यासाठी आरक्षित केली आहे. यात रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण या तालुक्यातील २५६ तर ठाण्यातील १४ गावांचा समावेश आहे. या संपूर्ण क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून सरकारने सिडकोची नियुक्ती केली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कोणत्याही बांधकामासाठी सिडकोची परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असले तरी अनेकांनी कोणतीही परवानगी न घेता बांधकामांचा धडाका चालविला आहे. तर विकास परवानगी मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असल्याच्या बतावणी करून काहींनी आपल्या बेकायदा गृहप्रकल्पातील घरे विकण्याचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे सध्या या क्षेत्रात सुरू असलेल्या बहुतांशी गृहप्रकल्पांच्या विकासकांनी परवानगीसाठी सिडकोकडे कोणताही प्रस्ताव पाठविला नसल्याचे दिसून आले आहे. असे असतानाही मोठमोठे फलक लावून व जाहिरातबाजी करून अनधिकृत घरे विकण्याचा गोरखधंदा तेजीत सुरू असल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. अशा बेकायदा गृहप्रकल्पांतून नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी आता सिडकोनेच पुढाकार घेतला आहे.या क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या कोणत्याही गृहप्रकल्पात घरे किंवा दुकाने विकत घेताना नागरिकांनी सदर बांधकामाला परवानगी आहे का, याची संबंधित विभागाकडून खातरजमा करून घ्यावी, फसवणूक टाळण्यासाठी प्रकल्पाची वैधता आणि सत्यतेची पडताळणी करण्याची पूर्णत: जबाबदारी संबंधित खरेदीदाराची असणार आहे. विकासकाकडून झालेल्या कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला सिडको जबाबदार राहणार नाही, असे सिडकोच्या वतीने घरे खरेदी करणाऱ्यांना स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)