शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

बडोदा बँक लूट प्रकरण : बँकेचा खातेधारक बनून केली रेकी, मुख्य आरोपीच्या शोधात पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:31 PM

बडोदा बँक लुटणा-या टोळीच्या संशयित चौघांना ताब्यात घेतल्यानंतर गेणा प्रसाद याचा पोलीस शोध घेत आहेत. गेणा हा सूत्रधार असून त्यानेच दुकानासाठी गाळा भाड्याने घेतला होता; परंतुत्याच्याविषयीची अधिक माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

नवी मुंबई : बडोदा बँक लुटणा-या टोळीच्या संशयित चौघांना ताब्यात घेतल्यानंतर गेणा प्रसाद याचा पोलीस शोध घेत आहेत. गेणा हा सूत्रधार असून त्यानेच दुकानासाठी गाळा भाड्याने घेतला होता; परंतुत्याच्याविषयीची अधिक माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.बँकेच्या सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे काढणारा प्रकार जुईनगर येथील बडोदा बँकेच्या लूट प्रकरणात घडलेला आहे. ३० फुटांहून लांब भुयार खोदून बँकेचे लॉकर तोडून सुमारे तीन कोटी रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान तिघांनी हा गुन्हा केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत होता. तसेच गुन्ह्याच्या पद्धतीवरून झारखंडच्या टोळीचा त्यात समावेश असल्याचीही शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात मात्र पाच ते सात जणांनी एकत्रित येऊन हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.बँकेत सुरक्षेच्या बाबतीत अनेक त्रूटी होत्या, असा ग्राहकांचाही आरोप आहे. अनेकदा लॉकर रूम उघडीच असताना कोणीही त्या ठिकाणी सहज जायचे. याच संधीचा फायदा घेत त्यांनी लॉकर रूमपर्यंतचे अंतर मोजून भुयार खोदून सुट्टीच्या दिवशी बँक लुटली. या संपूर्ण कटामागे गाळा भाड्याने घेणारा गेणा प्रसाद नावाने गाळा भाड्याने घेणारी व्यक्ती असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या टोळीने झारखंडची टोळी ज्या पद्धतीने बँका व ज्वेलर्सना लुटतात, त्याच पद्धतीने बडोदा बँक लुटलेली आहे.सीसीटीव्हीमुळे महत्त्वाची माहिती हातीपोलिसांनी बँकेच्या आवारातील, रेल्वेस्थानक व परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. त्याआधारे मुंबईतून चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी गेणा प्रसाद नावाने गाळा भाड्याने घेणाºया व्यक्तीला व त्याच्या सहकाºयांना मदत केल्याचे समजते.कामगार असल्याचे भासवून त्याने दुकानात ठेवलेल्या तिघांनी पाच महिन्यांत दुकानापासून ते बँकेच्या लॉकर रूमपर्यंत भुयार खोदले होते. याकरिता टोळीपैकी ऐकाने बडोदा बँकेत जनधन योजने अंतर्गत खाते उघडून रेकी केल्याचेही समजते.

टॅग्स :Crimeगुन्हा