बाळासाहेबांची शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख पदावर विजय चौगुले यांची नियुक्ती 

By नामदेव मोरे | Updated: October 11, 2022 14:57 IST2022-10-11T14:56:12+5:302022-10-11T14:57:18+5:30

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नवी मुंबई कार्यकारिणीची घोषणा केली आहे.

Balasaheb s Shiv Sena appoints Vijay Chaugule as Navi Mumbai District Chief | बाळासाहेबांची शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख पदावर विजय चौगुले यांची नियुक्ती 

फोटो - संदेश रेणोसे, नवी मुंबई

नवी मुंबई: बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नवी मुंबई कार्यकारिणीची घोषणा केली आहे. जिल्हाप्रमुख पदावर नवी मुंबई महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांची नियुक्ती केली आहे.

नवी मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे उपनेते विजय नाहटा यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्यासह दहा उपजिल्हाप्रमुखांची नियुक्ती केली. उपजिल्हाप्रमुख पदावर किशोर पाटकर, आकाश मढवी, जगदीश गवते, शिवराम पाटील, सुरेश कुलकर्णी, रोहिदास पाटील, दिपक वीरेंद्रसिंग, अजीत सावंत, सुरेश संकपाळ, विलास भोईर यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष जोमाने काम करेल. मुळ शिवसेना व पक्षचिन्ह ही लवकरच आम्हाला मिळेल असा विश्वास नाहटा यांनी व्यक्त केले. नवी मुंबईतील जुन्या इमारतींची पुनर्बांधणी, पार्किंगसह इतर प्रश्न सोडविण्यास ही प्राधान्य दिले जाईल असेही नाहटा यांनी स्पष्ट केले. नवनियुक्त जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनीही पक्षाचे काम जोमाने करणार असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Balasaheb s Shiv Sena appoints Vijay Chaugule as Navi Mumbai District Chief