खारघरमध्ये आॅस्ट्रेलियन बँडचा म्युझिक कार्यक्रम

By Admin | Updated: January 14, 2017 07:05 IST2017-01-14T07:05:22+5:302017-01-14T07:05:22+5:30

नवी मुंबईतील सहज योग ध्यान परिवाराच्या वतीने रविवार, १५ जानेवारी रोजी खारघरमधील उत्सव चौकात आॅस्ट्रेलियन

The Australian band music program in Kharghar | खारघरमध्ये आॅस्ट्रेलियन बँडचा म्युझिक कार्यक्रम

खारघरमध्ये आॅस्ट्रेलियन बँडचा म्युझिक कार्यक्रम

पनवेल : नवी मुंबईतील सहज योग ध्यान परिवाराच्या वतीने रविवार, १५ जानेवारी रोजी खारघरमधील उत्सव चौकात आॅस्ट्रेलियन बॅण्डचा ‘म्युझिक आॅफ जॉय’ या संगीतमय कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्र मात वेगवेगळ्या देशातील २० वादक सहभागी होणार असून यात भारतीय शास्त्रीय संगीत, सुफी तसेच लोक संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांना सहजयोग ध्यान धारणेचा अनुभव घेता येणार आहे.
आॅस्ट्रेलियन ‘म्युजिक आॅफ जॉय’ हा बॅण्ड गेल्या २० वर्षापासून संपूर्ण जगामध्ये प्रेम आणि शांतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहे. कार्यक्रमांमध्ये विविध राष्ट्र एकाच मंचावर पहावयास मिळणार असून कार्यक्र मात सहभागी विदेशी कलाकार भारतीय संस्कृतीचे धडे गिरवताना दिसतील. म्युझिक कार्यक्रमासोबतच सहज योगने एक पाऊल पुढे टाकत १४ आणि १५ जानेवारी रोजी उत्सव चौकामध्ये प्रदर्शनाचे आयोजन केले असून सकाळी ११ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.
प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना वैज्ञानिक पद्धतीने ध्यान-धारणा, ध्यानच्या माध्यमातून आरोग्य लाभ, भारतीय संस्कृती तसेच ध्यानचा संबध आदींची माहिती घेता येणार आहे. याशिवाय सर्व प्रेक्षकांना ध्यानपद्धती व त्यापासून मिळणाऱ्या शांतीचा अनुभव घेता येणार आहे. हे दोन्ही कार्यक्र म नि:शुल्क असून सर्व वयोगटातील नागरिकांसाठी उपयुक्त व खुले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The Australian band music program in Kharghar